पुलवामा आक्रमणाचे परिणाम पाकला भोगावे लागतील !

बिलावल भुत्तो यांचा पाकला घरचा अहेर !

असे असले, तरी ‘बिलावल भुत्तो अथवा त्यांचा पक्ष यांना भारताविषयी कणव आहे’, असा अपसमज भारतियांनी करून घेऊ नये. पाकमधील विरोधी पक्ष अशा प्रकारेच बोलत असतात; मात्र जेव्हा त्यांचा पक्ष सत्तेवर येतो, तेव्हा ते भारतविरोधी कारवाया करण्यात पुढाकार घेतात ! हाच आतापर्यंतचा इतिहास आहे !

लाहोर – जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने भारतीय सैन्यावर केलेल्या आक्रमणाचे भयंकर परिणाम पाकला भोगावे लागतील, असा घरचा अहेर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो झरदारी यांनी दिला आहे. लंडनमध्ये पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वीच भुत्तो यांचे वडील आसिफ झरदारी यांनीही पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली होती.

भुत्तो पुढे म्हणाले की, पाकला सध्या अनेक अंतर्गत आणि बाह्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खेळण्यातील बाहुल्यासारखे असलेले पंतप्रधान इम्रान खान ही परिस्थिती हाताळू शकत नाहीत. ते सध्या राजकीय नाटक करत आहेत; मात्र त्यांच्या या नाटकामुळे पाकिस्तान विनाशाकडे जात आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now