यवतमाळमधील काश्मिरी विद्यार्थ्यांना ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास भाग पाडले !

सहस्रोंच्या संख्येने स्थानिक काश्मिरी धर्मांध तरुण अतिरेक्यांना साथ देऊन जवानांवर आक्रमणे करून एकप्रकारे भारताशी छुपे युद्धच करत आहेत. दुसरीकडे सरकार अशा घटना थांबवण्यास अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत असतांना कुणा राष्ट्रप्रेमी युवकांकडून अशी प्रतिक्रिया उमटली, तर त्यात नवल ते काय ? याला सरकारच उत्तरदायी नव्हे काय ?

यवतमाळ – येथील काश्मिरी विद्यार्थ्यांना स्थानिक युवकांनी थोबाडित मारत ‘वन्देमातरम्’ म्हणायला लावले, तसेच ‘हिंदुस्थान झिंदाबाद’ म्हणण्यास भाग पाडले. याची चित्रफीत सगळीकडे प्रदर्शित होत आहे. स्थानिक काश्मिरी युवकांचा आतंकवादी आक्रमणात सहभाग असल्याचे मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now