सुरक्षादलांचे सैनिक आता विमानाने जम्मू-काश्मीरला प्रवास करणार 

४२ पोलिसांच्या हौतात्म्यानंतर केंद्र सरकारचा निर्णय

सैनिकांच्या सुरक्षेसाठी ही उपाययोजना केली, हे चांगले झाले; मात्र आतंकवादी भारतीय सैन्याच्या गाड्यांना लक्ष्य करतात; म्हणून रस्त्याने वाहतूक न करणे हा कायमचा पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आतंकवाद्यांचा आणि तो पोसणार्‍या पाकचा निःपात करून सर्वत्र सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास असली आक्रमणेच होणार नाहीत !

नवी देहली – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणात ४२ पोलीस हुतात्मा झाल्यावर आता केंद्र सरकारने ‘जम्मू आणि श्रीनगर येथे सुरक्षादलांना विमानाने सोडण्यात येईल’, असे घोषित केले आहे. आतापर्यंत हा प्रवास करण्यासाठी वाहनांचा वापर करण्यात येत होता. पुलवामा येथे अशा प्रकारे बसमधून पोलिसांना नेत असतांना त्यांच्या बसवर आक्रमण झाले होते. सीमा सुरक्षा दल, आसाम रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीआयएस्एफ्, एस्एस्बी, एन्एस्जी आणि आयटीबीपी यांच्या सैनिकांना विमानाने सोडण्यात येणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now