समोरून आरडीएक्सने गाडी भरून घेऊन येत असतांना त्याच्याशी संवाद कसा साधायचा ?

राम गोपाल वर्मा यांच्याकडून इम्रान खान यांच्यावर टीका

मुंबई – ‘संवादाने प्रश्‍न सुटले असते, तर तीन वेळा तुमचा घटस्फोट झाला नसता. समोरून एक जण तुमच्या दिशेने एक गाडी घेऊन येतो. ती आर्डीएक्सने भरलेली असते. त्या व्यक्तीशी आम्ही संवाद कसा साधायचा ?, हे खान यांनी शिकवावे. खान यांनी याविषयी मार्गदर्शन केल्यास आम्ही भारतीय त्यांना गुरुदक्षिणाही देऊ’ असे टीकात्मक ‘ट्वीट’ राम गोपाल वर्मा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना उद्देशून पुलवामा आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर केले आहे.

वर्मा यांनी यात म्हटले आहे, ‘प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल-कायदा तुमचे ‘प्ले स्टेशन्स’ नाहीत, असे मला कोणीच सांगितले नाही; मात्र ‘तुमचे त्या संघटनांवर प्रेम नाही’, असे तुम्ही म्हटल्याचे मी कधीही ऐकलेले नाही. हे चेंडू तुम्ही सीमेपार टोलवून भारताच्या पॅव्हेलियनमध्ये पाठवता. क्रिकेटचे चेंडू तुम्हाला बॉम्ब वाटतात का सर ? कृपया मार्गदर्शन करा.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now