अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या स्थगितीच्या निर्णयावरील सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई – शिवस्मारकाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ करता यावा, यासाठी न्यायालयाच्या स्मारकाच्या स्थगितीवरील निर्णयावर लवकर सुनावणी घ्यावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून स्मारकाच्या कामाच्या स्थगितीविषयी जलदगतीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामळे स्मारकाचे काम रखडण्याचे चिन्ह दिसत आहे.

वर्ष २०११ मध्ये राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने शिवस्मारकाच्या प्रकल्पासाठी ‘सीआरझेड’ च्या नियमावलीमध्ये दुरस्ती केली होती. या विरोधात ‘द कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट’ या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र न्यायालयाने स्मारकाच्या कामाला स्थगिती देण्यास नकार दिला. या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगई, न्यायमूर्ती एस्.के. कौल यांच्या खंडपिठाने शिवस्मारकाच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. शिवस्मारकाप्रमाणे अन्य अनेक याचिका न्यायालयाच्या प्रतिक्षेत आहेत, त्या डावलल्या जाऊ शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने कारण दिले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now