वर्ष २०१३ मधील विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांना  पैसे घेऊन उत्तीर्ण केले !

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून चौकशी चालू !

मुंबई – राज्यात वर्ष २०१३ मध्ये घेतलेल्या विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यात आले. नंतर त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली. यासंबंधी झालेल्या अपव्यवहाराची पोलीस महासंचालक कार्यालयाकडून चौकशी चालू आहे. मुंबईत असे अनुमाने १९६ बोगस पोलीस उपनिरीक्षक आहेत. मुंबईप्रमाणे अन्य ठिकाणी अशीच स्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परीक्षेत ३ पेपर घेण्यात आले होते. प्रत्येक पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ५० गुण, तर एकूण १५० गुण मिळविणे आवश्यक होते; मात्र एका पेपरमध्ये १८ गुण आणि एकूण ११० गुण मिळालेल्या अनुत्तीर्ण उमेदवारांनी लाच देऊन स्वतःला उत्तीर्ण करून घेतले. यामुळे जवळपास १३ सहस्र पोलीस हवालदारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष्य घालावे, अशी मागणी पोलीस कर्मचारी करत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now