विशेषाधिकार वापरून आयुक्तांकडून भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांचे निलंबन !

हे यापूर्वीच का केले नाही ?

मुंबई – पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी विशेषाधिकाराचा वापर करून नुकतेच एका लाचखोर पोलीस निरीक्षकाला बडतर्फ केले होते. आता त्यांनी आणखी एका उपनिरीक्षकाला सेवेतून बडतर्फ केले. पोलीस दलातील वादग्रस्त आणि कामचुकार पोलीस अधिकार्‍यांची सूची त्यांनी सिद्ध केल्याची सध्या चर्चा आहे.

देवनार पोलीस ठाण्यातील निरीक्षक दत्ता चौधरी यांना ८० सहस्रांंची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. चौकशीमध्ये चौधरी यांनी सत्र न्यायालय, वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेले आदेश पाळले नसल्याचे समोर आले. चौधरी यांचे वर्तन संशयास्पद आणि गंभीर असून पोलीस सेवेसाठी योग्य नसल्याचा ठपका ठेवत त्यांना जयस्वाल यांनी बडतर्फ केले. याच विशेषाधिकाराचा वापर करून पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. हवालदार अविनाश अंधारे याच्या साहाय्याने लॉटरी विक्रेत्याचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळल्याचा आरोप जाधव यांच्यावर आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now