हडपसर (पुणे) येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारास वेग !

आता एकच लक्ष्य..एकच ध्येय… हिंदु राष्ट्र ! हिंदु राष्ट्र !!

हडपसर (पुणे) २१ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने २ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला वेग आला आहे. गावागावांतील धर्मप्रेमीही हिंदु राष्ट्राच्या कार्याशी जोडले जात आहेत. काळेपडळ येथील कै. मारुतीराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बैठका, कोपरा बैठका, घरोघरी प्रसार, भित्तीपत्रके, हस्तपत्रके, होर्डिंग्ज आदी माध्यमांसह ‘सोशल मीडिया’द्वारेही हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला जात आहे.

प्रसारातील निवडक क्षणचित्रे

१. तरवडी येथील महिलांनी स्वतःहून समितीच्या कार्यकर्त्यांना बैठक घेण्यासाठी बोलावले. त्यासाठी त्यांनी स्वतः समन्वय करून बैठकीचे नियोजन केले. प्रसाराच्या काळात एका ठिकाणच्या बैठकीत विषय जाणून घेतल्यानंतर धुमाळमळा येथील म्हसोबा जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना विषय मांडण्यास बोलावले. त्या ठिकाणी समितीच्या सौ. गौरी बोराटे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

२. कल्याणराव जाधव महाविद्यालयात रणसंग्राम ग्रुप आणि श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात पाचशेहून अधिक शिवप्रेमींना हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ हा विषय सांगून सभेचे निमंत्रण देण्यात दिले. रणसंग्राम गटाचे श्री. महेश भोईबार यांनी ‘आम्ही भगवा ध्वज घेऊन ६०-७० जणांना घेऊन सभेला येऊ’, असे सांगितले.

३. चिंतामणीनगर येथे बालसंस्कार वर्गातील बालसाधक तन्मयतेने भित्तीपत्रक लावण्याच्या सेवेत सहभागी झाले.

४. भेकराईनगर येथील बस डेपोसमोरील रिक्शा थांब्यावर असणार्‍या धर्माभिमानी रिक्शाचालकांनी स्वतःहून रिक्शाच्या मागे सभेच्या निमंत्रणाचे पत्रक लावले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now