प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता ।

साधकांना कृपाळू दृष्टीने साधनेत स्थिर करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘मी आज घरातील सेवा (कामे) करतांना श्रीगुरूंचे स्मरण करत होते. तेव्हा माझी भावजागृती होत होती. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना कसे घडवत आहेत’, हे आठवून मला अपार कृतज्ञता वाटत होती. ‘प.पू. डॉक्टरांमुळे चराचर सृष्टीमध्येही कसे पालट घडत आहेत’, हे आठवून मन कृतज्ञतेने भरून येत होते. ‘प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मी काहीही लिहून दिले नाही,’ ही मला लागलेली रुखरुख प.पू. गुरुदेवांनी पुढील शब्दसुमने लिहून घेऊन दूर केली. 

परात्पर गुरु डॉ. आठवले

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । सूर्य प्रातःकाली उगवे ॥
दाहकता त्याची त्यागूनी तो । शीतल किरणांनी गुरुचरण स्पर्शे ॥ १ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । सरिता मार्ग बदले ॥
गुरुचरण स्पर्शिण्या । ती आसुुसलेली असे ॥ २ ॥

सौ. स्वाती राणे

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । वायू त्याचा वेग आवरे ॥
प.पू. डॉक्टर पहुडले आहेत । म्हणूनी तो मंद मंद वाहे ॥ ३ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । मेघ गडगडाट त्यागे ॥
शीतल सरींनी तो । शीतलता बरसे ॥ ४ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । धेनू पान्हा वाहे ॥
प.पू. एक घोट दूध प्राशन करता । कृतज्ञ नेत्रे ती पाहे ॥ ५ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । मोर पिसारा फुलवूनी थुईथुई नाचे ॥
कोण बरे हे रामनाथी । ज्यांचे तेज दाही दिशा उजळे ॥ ६ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । उल्हसित वृक्ष-लता-फुले-फळे ॥
गुरुदेवांच्या कृपेने आम्हांमध्ये । सात्त्विकतेचा मधुरस निर्माण होत असे ॥ ७ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । पक्षी किलबिलाट त्यागती ॥
प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर । असे ते मधुर स्वरे म्हणती ॥ ८ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । काक कर्कशता त्यागती ॥
कोण बरे हे पृथ्वीवरती । लिंगदेहा देती गती ॥ ९ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता ।  धन्य नागोठणे (टीप १) ॥
धन्य धन्य मी (टीप २) जाहले । गुरुदेवांचा पाळणा इथे डोले ॥ १० ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । धन्य माता-पिता ॥
गुरुदेवांचे गुणगान करता । सारी सृष्टी आता ॥ ११ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । धन्य सीतामाता (टीप ३) ॥
भाग्य मज लाभले गं बाई । श्रीरामासंगे सप्तपदी चालता ॥ १२ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । धर्मद्रोह्यांच्या उरांत धडकी भरे ॥
धर्मसंस्थापना करण्या । गुरुमाऊली अवतरली असे ॥ १३ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । साधक देहभान हरपले ॥
मोक्ष निश्‍चित झाला आता । नामस्मरणे काया-वाचे भरता ॥ १४ ॥

प.पू. डॉक्टरांचे स्मरण करता । धन्य पृथ्वीमाता ॥
आक्रंदन माझे थांबवील तो श्रीहरि (टीप ४) । रामराज्याची चाहुल तिजला लागली आता ॥ १५ ॥’

टीप १ – रायगड जिल्ह्यातील
टीप २ – नागोठणे
टीप ३ – प.पू. डॉक्टरांच्या धर्मपत्नी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले
टीप ४ – प.पू. डॉक्टर

– गुरुचरणी समर्पित,

सौ. स्वाती राणे, पर्ये, साखळी, गोवा. (२२.१०.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF