प्रक्रिया ही मनाला देवाशी जोडण्याची ।

‘व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ‘प्रक्रिया’ राबवतांना, म्हणजे स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न करतांना बर्‍याच साधकांच्या मनावर ताण येतो. त्यामुळे देवाने मला ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्यावर श्री गुरूंची कृपा कशी होते ?’, हे पुढील कविता सुचवून लक्षात आणून दिले.

कु. निकिता झरकर

प्रक्रिया नाही ही ताण घेण्याची ।
प्रक्रिया असे ही भगवंताप्रती अनन्य शरणागतीची ॥ १ ॥

प्रक्रिया ही कृतज्ञताभाव वाढवून अयोग्य विचार घालवण्याची ।
प्रयत्नरूपी भगवंताला सतत अनुभवण्याची ॥ २ ॥

प्रक्रिया म्हणजे दुसरे-तिसरे काही नाही ।
तर ही प्रक्रिया आहे मनाला देवाशी जोडण्याची ॥ ३ ॥

आपल्याला मूळ आनंदस्वरूपाकडे नेणारी प्रक्रिया ।
जणूकाही आपल्यासाठी साक्षात भगवंतच आहे  ॥ ४ ॥

आता पटला मनाला प्रक्रियेचा अर्थ ।
मग कशी येईल निराशा आणि चिंता व्यर्थ ॥ ५ ॥

यातूनच मनही होईल सर्व स्वीकारण्यास समर्थ ।
हीच तर आहेेे भगवंताची लीला सार्थ ॥ ६ ॥’

– कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now