सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग आणि श्री. निषाद देशमुख यांच्याकडून यज्ञयागादी धार्मिक विधींची माहिती सांगतांना होणार्‍या साधनेचे स्वरूप !

श्री. विनायक शानभाग

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात यज्ञयागादी धार्मिक विधी असतात, तेव्हा सनातनचे साधक श्री. विनायक शानबाग आणि श्री. निषाद देशमुख हे मधल्या वेळेत यज्ञयागांची माहिती उत्स्फूर्तपणे सांगतात. त्यांच्या प्रत्येक शब्दांतून त्यांचा परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि उपस्थित संत यांच्याप्रती असणारा कृतज्ञता भाव जाणवतो. त्यांचे निवेदन ऐकतांना ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे आणि त्यांचे बोलणे संपूच नये’, असे वाटते. त्यांचे बोलणे ऐकणार्‍या साधकांची भावजागृतीही होते. त्यामुळे ‘या दोन्ही साधकांना इतक्या चांगल्याप्रकारे निवेदन कसे करता येते ?’, हा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. याचे देवाने सांगितलेले उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

१. सनातनचे साधक श्री. विनायक शानबाग आणि श्री. निषाद देशमुख यांच्यावर श्री  गणेश आणि श्रीसरस्वतीदेवी यांची भरभरून कृपा असणे

श्री. निषाद देशमुख

सनातनचे साधक श्री. विनायक शानबाग आणि श्री. निषाद देशमुख यांच्यावर श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांची भरभरून कृपा आहे. श्री गणेशाच्या कृपेमुळे मनुष्याची बुद्धी सात्त्विक होऊन त्याला सूक्ष्मातील माहिती आणि ईश्‍वरी ज्ञान ग्रहण करता येते. श्री सरस्वती ही विद्या आणि वाचा यांची देवी आहे. तिच्या कृपेमुळे मनुष्याला विविध विद्या प्राप्त होतात आणि सूक्ष्मातून ग्रहण झालेले ज्ञान योग्य शब्दांत व्यवस्थित मांडता येते. श्री गणेशाची कृपा विचार आणि श्री सरस्वतीची कृपा वाचा (शब्द) यांच्या माध्यमातून कार्यरत असते. ज्यांच्यावर श्रीगणेशाची कृपा असते, त्यांची प्रतिभा जागृत होऊन त्यांना चांगले विचार स्फुरतात. ज्यांच्यावर सरस्वतीदेवीची कृपा असते, त्यांना ओघवत्या भाषेमध्ये बोलता येते. सनातनचे साधक श्री. विनायक शानबाग आणि श्री. निषाद देशमुख यांच्यावर श्री गणेश आणि श्रीसरस्वतीदेवी या दोन्ही देवतांची भरभरून कृपा असल्यामुळे त्यांना ईश्‍वराचे विचार स्फुरतात आणि ते ओघवत्या भाषेत मांडताही येतात. त्यामुळे त्यांना यज्ञयागादी धार्मिक विधींची माहिती, दैवी साक्ष, यज्ञाच्या वेळी घडलेल्या सूक्ष्मातील घडामोडी, संत आणि साधक यांना यज्ञाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती अन् त्यांच्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण इत्यादी विषय कागदावर न लिहिता उत्स्फूर्तपणे थेट मांडता येतोे.

२. यज्ञयागादी धार्मिक विधींची माहिती सांगतांना सनातनचे साधक श्री. विनायक शानबाग आणि श्री. निषाद देशमुख यांची विविध योगमार्गांतून होणारी साधना

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१९ रात्री ११)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now