(म्हणे) ‘युद्ध झाले, तर भारतातील मंदिरांमधील घंटानाद बंद होईल !’

पाकच्या रेल्वेमंत्र्यांची धमकी

  • ‘युद्ध झाले, तर भारतातील मंदिरांमधील घंटानाद नव्हे, तर भारतासह पाकमधील मशिदींतील अजान बंद होईल’, अशी धमकी भारतातील भाजप किंवा अन्य पक्षांचा एकतरी मंत्री कधी देऊ शकतो का ?
  • भारताच्या सैन्यशक्तीसमोर टीचभरही नसणारा पाक भारताला धमक्या देतो; कारण ‘भारतीय शासनकर्ते कणाहीन आहेत’, हे त्याने ७१ वर्षांत जाणले आहे !

 

इस्लामाबाद – भारताने शांततेची बोलणी केली, तर आम्हीसुद्धा शांततेविषयी बोलू; मात्र त्याने युद्धाची भाषा केली, तर आम्हीसुद्धा त्याच भाषेत उत्तर देऊ; मग ना कधी गवत उगवेल, ना चिमण्यांचा चिवचिवाट होईल आणि ना मंदिरात कधी घंटानाद होईल, अशी धमकी पाकचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी दिली आहे.

अहमद पुढे म्हणाले की, पाकिस्तान मुसलमानांचा गड आहे आणि आज सार्‍या जगातील मुसलमानांचे लक्ष पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानची २० कोटी जनता इम्रान खान यांच्यासमवेत आहे. युद्ध असो वा शांतता, देशातील जनता खान यांच्यासोबत आहे. आमच्यासाठी पाकिस्तान म्हणजे जीवन आहे आणि पाकिस्तान म्हणजेच मरण आहे. पाकिस्तानकडे कोणी वाकड्या दृष्टीने पाहिले, तर त्याचे डोळे काढून घेऊ, अशी धमकीही त्यांनी दिली.

(म्हणे) ‘पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना एक संधी दिली पाहिजे !’

राष्ट्रघातकी मेहबूबा मुफ्ती यांची मागणी

मेहबूबा मुफ्ती यांना आता एकही संधी न देता त्यांच्यावर देशद्रोही विधाने केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारागृहातच डांबले पाहिजे; मात्र असे धाडस भाजप सरकार करण्याची शक्यता नाही, हेही तितकेच खरे !

श्रीनगर – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकताच पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांना एक संधी दिली गेली पाहिजे, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून केली आहे. तसेच ‘दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. त्यामुळे युद्धाची भाषा करणे, सूड घेण्याची भाषा करणे हे अशिक्षित आणि अज्ञानी असण्याचे लक्षण आहे’, असेही त्यांनी म्हटले. (भाजपने पाकची बाजू घेणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांच्यासमवेत काश्मीरमध्ये ३ वर्षे सत्ता उपभोगली. त्याच्यासाठी हे लज्जास्पद आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF