आतंकवादामुळे जम्मू-काश्मीरची ३० वर्षांत ४ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांची हानी

  • जिहादी आतंकवादामुळे भारताची प्रचंड हानी होऊ देणारी लोकशाही आता पुरे !
  • भारताची इतकी हानी करणार्‍या पाकपुरस्कृत आतंकवादाला कायमचे नष्ट करण्याचे काम देशावर गेली ७१ वर्षे राज्य करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी का केले नाही ?, याचे उत्तर जनतेने त्यांच्याकडे मागितले पाहिजे आणि त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली पाहिजे !

नवी देहली – जिहादी आतंकवादामुळे जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या ३० वर्षांत आतंकवादी कारवायांमुळे राज्याची ४ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक हानी झाली आहे. ही रक्कम राज्याच्या सध्याच्या ८८ सहस्र ९११ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाच्या ५ पट आणि १ लाख ५७ सहस्र कोटी रुपयांच्या ‘जीडीपी’च्या (आर्थिक विकास दराच्या) तुलनेत सुमारे ३ पट आहे.

१. गेल्या १८ वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने साहाय्य रकमेत ५५० टक्के वाढ केली असतांना अशी हानी झाली आहे.

२. गेल्या ४० वर्षांत जम्मू-काश्मीरच एकमेव असे राज्य आहे जेथे विकासासाठी केंद्र सरकार ८० टक्क्यांपेक्षा अधिक अनुदान देत आहे. इतर राज्यांत ही टक्केवारी सरासरी २० टक्के एवढी आहे.

३. जम्मू-काश्मीरच्या लोकांना सरकार इतर राज्यांच्या तुलनेत ८ पट अधिक निधी देते. वर्ष १९९२-९३ मध्ये जेथे इतर राज्यांतील लोकांना प्रति व्यक्ती ५७६ रुपयांचे साहाय्य मिळत होते, तेथे जम्मू-काश्मीरमध्ये प्रति व्यक्ती ३ सहस्र १९७ रुपये साहाय्य मिळत होते. (एवढ्या मोठ्या प्रमाणात तेथील धर्मांधांवर सरकार पैसा खर्च करते; मात्र हे धर्मांध सैनिकांवर दगडफेक करून, आतंकवाद्यांना साहाय्य करून त्याची परतफेड करतात, हे संतापजनक होय ! – संपादक)

४. वर्ष २००१ मध्ये जम्मू-काश्मीरसाठी हा आकडा ८ सहस्र ९२ रुपये होता, तर इतर राज्यांसाठी तो १ सहस्र १३७ रुपये झाला होता. सध्याच्या स्थितीतही हा भेद ८ पटींनी अधिक झाला आहे.

५. आतंकवादामुळे बेघर होऊन निर्वासित छावण्यांत रहाणार्‍या प्रत्येक काश्मिरी नागरिकाला १ मे २०१५ पासून सरकार प्रतिमहा २ सहस्र ५०० रुपये वेतन देत आहे. ही रक्कम कुटुंबासाठी अधिकाधिक १० सहस्र रुपये प्रति मास एवढी आहे.

६. काश्मीर खोर्‍यात १ दिवस संचारबंदी लादल्यास सरासरी २५० ते ३०० कोटी रुपयांची हानी होते. वर्ष २०१६ मध्ये १५ दिवस संचारबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे १० सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी झाली.

७. वर्ष १९९० ते २००१ या कालावधीत काश्मीर खोर्‍यात आतंकवाद्यांनी १ सहस्र १३४ सरकारी बांधकामे, ६३३ शाळांच्या इमारती, ३३३ पूल आणि ११ रुग्णालये उद्ध्वस्त केली. तसेच १० सहस्र २६३ घरे आणि १ सहस्र ९३२ दुकाने उद्ध्वस्त केली. वर्ष १९९०, १९९२ आणि १९९५ या वर्षांमध्ये ५ सहस्र ३६८ घरे आणि दुकाने नष्ट करण्यात आली. (याच काळात काश्मिरी हिंदूंना तेथून हाकलून लावण्यात आले. त्यामुळे ही घरे आणि दुकाने कोणाची आहेत, हेही सरकारने घोषित करावे; म्हणजे कोणाची हानी अधिक झाली आहे, हे जगाला समजेल ! – संपादक)

८. आतंकवादामुळे येथील मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. श्रीनगर, कारगिल आणि जम्मूसह ८ जिल्ह्यांत सरकारला विद्यार्थ्यांअभावी ३ सहस्र शाळा बंद कराव्या लागल्या.

९. जम्मू-काश्मीरच्या ७५.६८ टक्के शाळांत अद्याप वीजजोडणी झाली नााही. १५ सहस्र ५९७ शाळांमध्ये अद्याप वीज नाही. यामध्ये १० सहस्र ८१७ प्राथमिक, ५ सहस्र ४०० माध्यमिक आणि ३८० उच्च माध्यमिक शाळा आहेत.

१०. आतंकवाद चालू होण्यापूर्वी जीडीपीत पर्यटनाचा वाटा १० टक्के होता, तो आता ०.५ टक्के राहिला आहे.


Multi Language |Offline reading | PDF