पाक सैन्य सांगेल, तसेच इम्रान खान वागतात ! – इम्रान खान यांच्या पूर्व पत्नीचा दावा

इम्रान खान यांची तळी उचलणार्‍या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आता यावर काही बोलतील का ?

 

इस्लामाबाद – पुलवामा आक्रमणानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी इम्रान खान हे तेथील सैन्याच्या अनुमतीची वाट पहात होते, असे त्यांची पूर्व पत्नी रेहम खान यांनी म्हटले आहे. ‘स्वतःच्या तत्त्वांना तिलांजली देऊन इम्रान खान सत्तेवर बसले आहेत’, असा आरोपही त्यांनी केला.

रेहम खान म्हणाल्या की, इम्रान खान यांना जे पाकिस्तानी सैन्याने शिकवले आहे, तेच ते करत आहेत. पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कंगाल घोषित करण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेले ६-७ मास इम्रान खान यांनी देशाच्या हितासाठी काहीही केलेले नाही. ते म्हणत असतील, ‘जैश-ए-महंमदशी पाकिस्तानी सरकारचे काहीही संबंध नाहीत’, मग आतापर्यंत या आतंकवादी संघटनेविरुद्ध कारवाई का करण्यात आली नाही ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now