सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांचे स्वागत कसे करायचे ? – हॉटेलचालकांचा प्रश्‍न

पुलवामा आक्रमणानंतर आगर्‍यातील हॉटेल्समध्ये काश्मिरी नागरिकांना बंदी

भारतियांमध्ये आतंकवाद्यांच्या विरोधात जेवढा रोष आहे, त्याहून अधिक त्यांना साहाय्य करणार्‍या काश्मिरींविषयी आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर धडक कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !

आगरा (उत्तरप्रदेश) – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर आगर्‍यामधील हॉटेलचालकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये काश्मिरी नागरिकांना खोली न देण्याचा निर्णय घेतला आहेे. या संदर्भातील काही पत्रकेही त्यांच्याकडून प्रसारित करण्यात आली आहेत. ताजमहालच्या जवळील ईदगाहच्या परिसरात अनेक हॉटेलचालकांनी असा निर्णय घेतला आहे.

१. यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना एका हॉटेलचे व्यवस्थापक फिरदौस अली म्हणाले की, भारतीय सैनिकांवर काश्मिरी लोक दगडफेक करतात आणि आक्रमण करतात. याच्या निषेधार्थ आम्ही हा निर्णय घेतला आहे. आपल्या सैनिकांवर आक्रमण करणार्‍या काश्मिरींचे आम्ही स्वागत कसे करावे ? जर त्यांनी त्यांच्या वागण्यात पालट केला, तरच आम्ही त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ.

२. दुसरीकडे आगर्‍यातील हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राकेश चौहान म्हणाले, ‘‘हा निर्णय चुकीचा आहे. या भागातील केवळ दोनच हॉटेलांनी काश्मिरींसाठी हॉटेल न देण्याचा निर्णय घेतल्याचे आम्हाला कळले आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांना आम्ही मध्यस्थी करण्यास सांगितले आहे. काश्मिरी आपले बांधव आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अशी बंदी आणणे, हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही. आतंकवाद काश्मीरवर परिणाम करत असला, तरी यासाठी तेथील रहिवाशांना आपण उत्तरदायी ठरवू शकत नाही. आपल्याला आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी, काश्मिरी जनतेविरोधात नाही.’’ (सैनिकांवर दगडफेक करणारे आणि आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या धर्मांध काश्मिरींविषयी पुळका असणार्‍या अशा सर्वधर्मसमभावी हिंदूंवर प्रथम कारवाई करायला हवी ! उत्तरप्रदेशमध्ये धर्मांध काश्मिरी विद्यार्थी उघडउघड ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देतात. त्यांना साहाय्य करणे, हा राष्ट्रघात होय ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF