३७० कलम रहित करण्यासाठी भाजपच्या आमदाराची ‘ऑनलाईन’ मोहीम

स्वतःचे सरकार असतांना आमदारांना अशी मोहीम चालू करावी लागणे भाजपला लज्जास्पदच ! फुटीरतावादाला प्रोत्साहन देणारे ३७० कलम रहित करण्यासाठी भाजप सरकारने इतकी वर्षे काय केले ? अशा मोहिमा राबवण्याऐवजी आमदारांनी हे कलम रहित होण्यासाठी सरकारवर दबाव आणावा !

मुंबई – जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले ३७० कलम रहित करण्यासाठी ‘ऑनलाईन’ मोहीम चालू करण्यात आली आहे. त्यासाठी ‘ऑनलाईन साइन इन’ करून पाठिंबा द्या, असे आवाहन भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. या कलमातील तरतुदीच्या अंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी केवळ संरक्षण, विदेश आणि दळणवळण यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे. अन्य कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची अनुमती घेणे आवश्यक आहे. याचा फुटीरतावादी आणि पाकिस्तान अपलाभ घेत असून येथे आतंकवादी कारवाया घडवून आणत आहेत. हे सर्व थांबावे, यासाठी येथे लागू असलेले ३७० कलमच रहित करण्याची मागणी करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF