प्रत्येकच कृती परिपूर्ण करण्याचा ध्यास असणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू !

पू. (सौ.) उमा रविचंद्रन

‘मी काढलेली भावचित्रे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकूंना पहाण्यास पाठवली. तेव्हा त्यांनी त्यात सुधारणा सांगितल्या. आतापर्यंत एखादी अनुभूती आल्यानंतर मी भावचित्रे काढत असे. त्या वेळी ती चित्रे परिपूर्ण काढण्याचा विचार माझ्याकडून होत नसे. आता हे मी सद्गुरु काकूंकडून शिकत आहे. चित्रांतील सुधारणा त्या अतिशय बारकाव्यांसहित सांगतात. त्यांनी सांगितल्यानुसार मी चित्रांत सुधारणा केल्यावर मला त्यांत पुष्कळ फरक जाणवतो.

तिरुपती बालाजीच्या छायाचित्रात डावा हात झाकलेला होता आणि मीही तसेच चित्र काढले. त्यांनी मला सांगितले, ‘‘तिरुपती बालाजीच्या चित्रामध्ये श्री बालाजीचा डावा हातही दिसायला हवा आणि आरतीच्या तबकातील दिव्याची ज्योत स्पष्ट दिसली, तर चित्र अधिक चांगले दिसेल.’’ माझ्या हे जराही लक्षात आले नाही. ‘तपस्वी बाला’च्या चित्रात त्यांनी सांगितले, ‘‘बालाचा उजवा पाय गुडघ्यात काटकोनात (right angle) वाकलेला दाखवल्यास ती नृत्याची योग्य मुद्रा होईल.’’ सद्गुरु काकूंच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे मला आता चित्र परिपूर्ण काढण्याचे महत्त्व कळले. त्यासाठी सद्गुरु काकूंच्या चरणी कृतज्ञता !’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२१.१.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF