साधना म्हणून नव्हे, तर पैसे मिळवण्याचा व्यवसाय म्हणून नाडीपट्टीवाचनाद्वारे भविष्यकथन करणारे काही नाडीवाचक !

श्री. दिवाकर आगावणे

१. अनेक नाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती असणे; पण त्याविषयी काही नाडीवाचकांमध्ये उदासीनता आढळणे

‘भारतातील बर्‍याच ठिकाणी मुख्यत्वे तमिळनाडूमध्ये असणार्‍या बर्‍याच नाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अनेक वेळा ‘हे अवतारी आहेत. महान पुरुष आहेत. श्रीकृष्णानेच ‘जयंत’ नावाच्या रूपात कलियुगात पुन्हा अवतार घेतला आहे. सध्या संपूर्ण पृथ्वीवर परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेव गुरु आहेत. या महान गुरूंचे आध्यात्मिक कार्य अद्वितीय आणि समष्टी कल्याणासाठी आहे’, अशी महत्त्वाची अन् वैशिष्ट्यपूर्ण माहिती या सर्व नाडीपट्ट्यांमध्ये आहे. एवढे सर्व असूनही जे नाडीपट्टी वाचून त्याचे कथन करतात, त्या नाडीपट्टीवाचकांची त्यासंदर्भात कार्य करण्याबद्दल उदासीनता आढळली.

२. नाडीवाचन हे साधना म्हणून नव्हे, तर व्यवसाय म्हणून करणारे काही नाडीवाचक !

नाडीपट्टीत असलेले ज्ञान अमूल्य आहे. ‘नाडीपट्टी’ ही नाडीपट्टीवाचकांसाठी सर्वस्व आहे. त्यांची नाडीपट्टीवर नितांत श्रद्धा आहे. अशा नाडीपट्टीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी एवढी वैशिष्ट्यपूर्ण माहिती वाचनात येऊनही हे नाडीवाचक परात्पर गुरु डॉक्टरांशी संबंधित नाडीवाचनाचे पैसे घेतात. त्यामुळे ‘त्यांना नाडीपट्टीतील ज्ञानाचे महत्त्व खर्‍या अर्थाने अद्याप उमजले आहे का ?’, असा प्रश्‍न पडतो. ‘सहस्रो वर्षांपूर्वी महर्षींनी जे सांगितले, ते केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशाने वाचून सोडून द्यायचे’, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. आज काही नाडीवाचकांची अवस्था एवढी वाईट आहे की, प्रत्यक्ष ईश्‍वर जरी त्यांच्यासमोर वाचनासाठी आला, तरी ते त्याच्याकडूनही पैसे घेतल्याविना रहाणार नाहीत. थोडक्यात, नाडीवाचक नाडीवाचन हे साधना म्हणून नव्हे, तर व्यवसाय म्हणून करतात. ‘आयुष्यभर नाडीवाचनाच्या माध्यमातून पैसे मिळवणे’, हा एकमेव उद्देश ठेवल्याने त्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही. याउलट सर्वस्वाचा त्याग करून साधना करणार्‍या सनातन संस्थेच्या साधकांची प्रगती ईश्‍वराच्या कृपेने शीघ्र गतीने होत आहे.’

– श्री. दिवाकर आगावणे (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत अभ्यासदौर्‍यात सहभागी विद्यार्थी), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२.६.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF