‘पीएसी’ अहवालाला अनुसरून गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विरोधात काँग्रेस ‘हक्कभंग’ प्रस्ताव आणणार

पणजी, २० फेब्रुवारी (वार्ता.) – अनधिकृत खाण व्यवसायाच्या विषयावर ‘पब्लिक अकाऊंट्स कमिटी’ (पीएसी) अहवालाच्या माध्यमातून विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी वर्ष २०११मध्ये अनधिकृत खाण व्यवसायाला अनुसरून गोवा विधानसभा आणि गोव्यातील जनता यांची दिशाभूल केली आहे. या प्रकरणी काँग्रेस विधीमंडळ गट विद्यमान मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते चेल्लाकुमार यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या अहवालात विद्यमान मुख्यमंत्री पर्रीकर यांनी खाण व्यवसायातील अनधिकृत कामांवर बोट ठेवले होते आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत खाण व्यवसायाचे अन्वेषण करण्यासाठी शहा आयोग नेमला होता. भाजपचे आमदार तथा मंत्री नीलेश काब्राल यांनी नुकत्याच एका खासगी वृत्तवाहिनीकडे विद्यमान मुख्यमंत्री पर्रीकर यांचा त्या वेळेचा ‘पीएसी’ अहवाल, ही एक राजकीय खेळी असल्याचा दावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाने उपरोल्लेखित निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF