टेनिसपटू सानिया मिर्झा या पाकच्या सून असल्याने त्यांना तेलंगणच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून काढा !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांची मागणी

भाग्यनगर – टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी भारतीय असल्याचा दावा केला आहे. त्यांनी एका पाकिस्तानी खेळाडूशी लग्न केले आहे. त्यामुळे त्या पाकिस्ताच्या सून आहेत. त्यांना तेलंगणच्या ‘सदिच्छा दूत’(ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर) या पदावरून काढा आणि त्यांच्या जागी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल किंवा पी.व्ही. सिंधू यांना हे पद द्या, अशी मागणी येथील आमदार टी. राजासिंह यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. पुलवामा येथील आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.

पुलवामा येथील आक्रमणानंतर सानिया मिर्झा यांनी ट्वीट करून म्हटले होते,  ‘मी देशभक्त आहे, हे वाटण्यासाठी मला सामाजिक माध्यमांची आवश्यकता नाही. ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे, ज्यांना हे वाटते आहे की, मी आक्रमणाचा निषेध करणारी पोस्ट केली पाहिजे; कारण आम्ही ‘वलयांकित’ (सेलिब्रिटी) आहोत; मात्र मला तशी आवश्यकता वाटत नाही.’ (देशभक्त असण्यासाठी सामाजिक माध्यमांत पोस्ट करायला हवी, असे बंधन नाही; मात्र ‘सानिया मिर्झा देशभक्त नाही’, असे जनतेला वाटत असेल, तर देशभक्तीसाठी पोस्ट करण्यात काय अडचण आहे ? – संपादक) यामुळे तिच्यावर सामाजिकमाध्यमांतून टीका होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF