पुलवामा येथील आक्रमण ही भयानक घटना ! – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमण ही भयानक घटना आहे. या प्रकरणी योग्य वेळी आमचे म्हणणे घोषित करू, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता रॉबर्ट पालाडिनो म्हणाले की, या आक्रमणाला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा दिली जाईल. या आक्रमणाच्या अन्वेेषणासाठी पाकिस्तानने पूर्ण सहकार्य करावे आणि उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा करावी. आक्रमणानंतर अमेरिका पाकिस्तानच्या संपर्कात आहे, असेही ते म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF