न्यूझीलंडच्या संसदेत पुलवामा आक्रमणाच्या निषेधाचा ठराव संमत

कॅनबेरा (न्यूझीलंड) – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध करणारा ठराव न्यूझीलंडच्या संसदेमध्ये एकमताने संमत करण्यात आला. न्यूझीलंडचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान विन्स्टन पिटर्स यांनी २० फेब्रुवारीला हा ठराव त्यांच्या संसदेत मांडला. ठराव मांडतांना ते म्हणाले की, या ठरावाद्वारे भारताच्या या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्यासमवेत आहोत. तसेच हुतात्म्यांच्या  कुटुंबियांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करत आहोत.

भारत दौर्‍यावर आलेले सौदी अरेबियाचे राजपूत्र महंमद बिन सलमान यांनी या प्रकरणी ‘आम्ही तुमच्यासमवेत आहोत’, असे म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF