अमेरिकेचे आस्थापन ‘एफ्-२१’ लढाऊ विमाने भारतात बनवण्यास सिद्ध

वॉशिंग्टन – अमेरिकेतील आस्थापन ‘लॉकहीड मार्टिन’ने भारताला नवीन ‘एफ्-२१’ ही लढाऊ विमाने बनवून देण्याची सिद्धता दर्शवली आहे. भारतीय वायूदलाच्या आवश्यकतेनुसार ही विमाने बनवून देण्यात येणार आहेत. तसेच या विमानांचे उत्पादन भारतातच करण्यास हे आस्थापन सिद्ध आहे. लॉकहीड मार्टिन भारतीय वायूदलाकडून ११४ लढाऊ विमानांचे कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेत आहे. यापूर्वी तिने ‘एफ्-१६’ लढाऊ  विमानांचे उत्पादन भारतात चालू करण्याचा प्रस्ताव दिला होता. भारतीय वायूदलाकडून कंत्राट मिळवण्यासाठी ४ ते ५ आस्थापने प्रयत्न करत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now