योग करूनच लोक पंतप्रधान होतात ! – योगऋषि रामदेवबाबा

रायपूर (छत्तीसगड) – जे लोक योग करतात, त्यांच्या नशिबी राजयोग येतो. नेहरू योग करायचे. त्यामुळे ते शेवटपर्यंत पंतप्रधान राहिले. इंदिरा गांधीही योग करायच्या. त्यामुळे त्यांचा राजयोगही चांगला होता. मोदी योग करायला लागल्यावर एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही योग करायला लागले आहेत. त्यामुळेच भाजपसाठी संघर्ष कठीण झाला आहे, असे विधान योगऋषि रामदेवबाबा यांनी केले. यावर ‘राहुल गांधी पंतप्रधान होतील का?’ असे विचारले असता ते म्हणाले की, माझ्या बोलण्याचा अर्थ असा नसून मी केवळ योगाचे महत्त्व विषद करत आहे.


Multi Language |Offline reading | PDF