सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधनेविषयीची माहिती देण्यात आली आहे ! – स्वामी प्रणावपुरी महाराज, मथुरा, उत्तरप्रदेश

स्वामी प्रणावपुरी महाराज (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देऊन सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी), २० फेब्रुवारी (वार्ता.) – देशातील तरुण पिढी संस्कार आणि मर्यादा विसरून धर्म अन् संस्कृती यांच्यापासून दूर जात आहे. त्या दृष्टीने सनातनची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची कल्पना फार चांगली आहे. या प्रदर्शनात मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधना आणि माया म्हणजे काय आहे, हे सांगितले आहे. मनुष्याला ठाऊक नसते की, त्याने काय करायला हवे. तो केवळ पैसा कमवत पुढे जात असतो. या प्रदर्शनातून मनुष्याला दिशा मिळेल. या प्रदर्शनातून गोरक्षा, गंगा नदी स्वच्छता, कर्मकांड, संस्कार यांची माहिती देण्यात आली आहे. सनातनला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला मी तन, मन आणि धन स्वरूपात साहाय्य करीन, असे प्रतिपादन मथुरा येथील कथावाचक स्वामी प्रणावपुरी महाराज यांनी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी स्वामी प्रणावपुरी महाराज यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. त्यानंतर समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना समितीपुरस्कृत ग्रंथ भेट दिला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now