भरतनाट्यम्चा सराव करतांना कु. सिद्धी सारंगधर यांना आलेली अनुभूती

कु. सिद्धी सारंगधर

भरतनाट्यम्चा सराव करतांना पदन्यास चुकणे, सहसाधिकेला विठ्ठल समजून स्वतः रुक्मिणी असल्याचा भाव ठेवून नृत्य केल्यावर पदन्यास जमू लागणे आणि आज्ञाचक्रावर नाद जाणवून तेथून वलय बाहेर पडत असल्याचे जाणवणे : ‘४.५.२०१७ या रात्री ८.३० ते ९.४५ या कालावधीत मी आणि कु. प्रतीक्षा आचार्य भरतनाट्यम्चा सराव करत होतो. त्या वेळी माझा पदन्यास चुकत होता, म्हणजे पदन्यासाकडे लक्ष दिल्यावर त्याला भावजागृतीचा प्रयत्न जोडता येत नव्हता आणि भावजागृतीचा प्रयत्न जोडायला गेले, तर पदन्यास चुकत होता. त्यानंतर ‘नट्ट अढाऊ’चे प्रकार करतांना (भरतनाट्यम्मधील पदन्यासाला ‘अढाऊ’ म्हणतात.) एका पदन्यासाच्या वेळी कु. प्रतीक्षा आचार्य ‘विठ्ठल जसा कमरेवर हात ठेवून उभा रहातो’, तशी उभी होती. तिच्याकडे पाहून मी स्वतःला रुक्मिणी समजून ‘विठ्ठलासमवेत नृत्य करत आहे’, असा भाव ठेवल्यावर मला आपोआप पदन्यास जमायला लागला आणि माझ्या तोंडवळ्यावर भाव आणि हास्यही आले. त्याच वेळी देवळातील घंटा वाजवल्यावर त्याचा नाद घुमत रहातो, तसा ‘धननननन’ असा आवाज मला माझ्या आज्ञाचक्रावर जाणवला आणि ‘आज्ञाचक्रातून गोल वलय बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले. सरावानंतर आम्ही एकत्र बसल्यावर या अनुभूतीची प्रकर्षाने जाणीव झाली.’

– कु. सिद्धी सारंगधर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF