सनातनच्या साधकांच्या पूर्वजांना मुक्ती लाभावी, यासाठी रामनाथी आश्रमात भृगु महर्षींच्या आज्ञेने पितरपूजन !

माघ पौर्णिमेला आलेल्या मघा नक्षत्रावर पितरपूजन करण्याचा दुर्मिळ योग !

रामनाथी (गोवा) – माघ पौर्णिमेला (१९ फेब्रुवारीला) रामनाथी आश्रमात भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार पितरपूजन पार पडले. ‘संपूर्ण पृथ्वीवरील देवपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे देवलोकात स्थान प्राप्त केलेले जीव), ऋषिपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे ऋषिलोकात स्थान प्राप्त केलेले जीव) आणि मनुष्यपितर, सनातनचे दिवंगत साधक, तसेच सर्व साधकांचे पूर्वज यांना मुक्ती लाभावी, यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पितरपूजन करावे’, असे भृगु महर्षींनी चेन्नई येथील नाडीपट्टीवाचनाद्वारे सांगितले होते. त्यानुसार सद्गुरुद्वयींनी पूजनाचा संकल्प केला. त्यानंतर सप्तनद्यांचे जल कलशात भरून त्यात देवपितर, ऋषिपितर आणि मनुष्यपितर यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन केले. सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी तर्पणविधी केला. सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी या विधीचे पौरोहित्य केले.

पितरांसाठी तर्पण करतांना पू. पृथ्वीराज हजारे
पितरपूजन विधीचा संकल्प करतांना डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

पितरपूजनाच्या वेळी मघा नक्षत्र होते. मघा नक्षत्रावर श्राद्धविधी करतात. माघ पौर्णिमेला क्वचित मघा नक्षत्र असते. या वेळी हा दुर्मिळ योग जुळून आला होता. त्यामुळे आजची तिथी पितरपूजनासाठी योग्य असून हे महर्षींनी सहस्रो वर्षांपूर्वीच लिहून ठेवले आहे, यावरून महर्षींचे श्रेष्ठत्व लक्षात येते. ‘अवतार अनेक जिवांचा उद्धार करतात. श्रीरामावतारात आणि श्रीकृष्णावतारात भगवंताने विभिन्न योनींत अडकलेले देवगण, ऋषिगण यांना मुक्त केले. १९ फेब्रुवारीचा माघ पौर्णिमेचा दिवसही असाच आहे’, असे पितरपूजनाविषयी महर्षि भृगु यांनी म्हटले आहे.

हिंदु धर्मातील सिद्धान्तानुसार ईश्‍वरप्राप्तीसाठी देवऋण, ऋषिऋण, समाजऋण आणि पितरऋण फेडावे लागते. श्रीगुरूंच्या कृपेने या चारही ऋणांतून मुक्त होता येते. ‘महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पार पडलेल्या पितरपूजनाने सनातनच्या सर्व साधकांच्या पूर्वजांना मुक्ती लाभणार आहे’, असा महर्षींचा संकल्प आहे. याविषयी महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now