साध्वी प्रज्ञासिंह आता ‘आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी पूर्णचेतनानंद गिरी’ झाल्या !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

प्रयागराज – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ९ वर्षे कारागृहात अत्यंंत अत्याचारात घालवणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना माघ पौर्णिमेच्या दिवशी कुंभमेळ्यामध्ये भारत भक्ती आखाड्याचे त्यांना प्रमुख बनवण्यात आले आहे. त्या आता ‘आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी पूर्णचेतनानंद गिरी’ या नावाने ओळखल्या जाणार आहेत. ‘दिव्य प्रेम सेवा मिशन’च्या एका शिबिरामध्ये सकाळी त्यांंच्यावर पट्टाभिषेक करण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंह यांचे स्वीय सहाय्यक अरुण सिंह यांनी सांगितले की, आखाड्याचे काम सनातन धर्माचे रक्षण करण्याचे आहे. अखिल भारतीय काशी विद्वत परिषदेने आजच या आखाड्याची स्थापना केली आहे. अटकेनंतर त्यांना जुना आखाड्यातून काढून टाकण्यात आले होते; मात्र त्यांचे निलंबन परिषदेच्या हस्तक्षेपामुळे मागे घ्यावे लागले होते. याकाळात त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now