हिंदु विचारांची यथार्थता अभिमानाने मांडण्याची सुवर्णसंधी ‘दि मिथ ऑफ हिंदु टेरर’ या पुस्तकाने दिली ! – प्रा. डॉ. अशोक मोडक

ठाणे – पुलवामा घटनेचे विश्‍लेषण करतांना आता जनतेच्या भाषेत होणारा पालट स्वागतार्ह आहे. स्वामी विवेकानंद यांचे १८९७ च्या लाहोर भाषणाच्या स्मृती प्रखरपणे जाग्या होत आहेत. आर्.व्ही.एस् मणी यांनी अतिशय निर्भीडपणे सत्यकथन केले आहे. मणी यांचे धाडस अभिनंदनीय आहे. मणी यांनी पुस्तक लिहून हिंदु दहशतवादाचे कुभांड हाणून पाडले आहे. मणी यांच्या पुस्तकाचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे. हिंदु विचारांची महती, उदारता सर्वत्र पसरवण्याची, अभिमानाने मांडण्याची सुवर्णसंधी मणी यांच्या ‘दि मिथ ऑफ हिंदु टेरर’ या पुस्तकाने दिली आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अशोक मोडक यांनी केले. दीनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित ‘हिंदु दहशतवाद नावाचे थोतांड’ या जाहीर परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अशोक मोडक बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, माजी केंद्रीय गृहसचिव (अवर) आणि ‘दि मिथ ऑफ हिंदु टेरर’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक आर.व्ही.एस्. मणी, पुस्तकाचे मराठी अनुवादक अरुण करमरकर आदी होते. येथील सहयोग मंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. परिसंवादाचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.

लेखक आर.व्ही.एस्. मणी

भाऊ तोरसेकर या वेळी म्हणाले, ‘‘समाजाच्या श्रद्धा ढासळून टाकण्याचे संघटित प्रयत्न गेली ७० वर्षे चालू आहेत. जिहादच्या माध्यमातून श्रद्धांना पोखरण्याचे प्रयत्न होत आहेत. आपल्या कर्तव्यनिष्ठा क्षीण होत आहेत. समाजाप्रती असलेल्या भावनांचा विसर पडत आहे. देशाविषयी आपली भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येकाने पुढाकार घेऊन कार्यरत झाले पाहिजे. ‘आम्ही बांधू ते तोरण, आम्ही सांगू ते धोरण’ हे पुरोगामित्व पराभूत करण्यासाठी सक्रीय झाले पाहिजे.’’

मणी यांनी मांडलेली सूत्रे

  • महाराष्ट्राला हिंदु आतंकवादाची प्रयोगशाळा करण्याचे योजले होते. हिंदु दहशतवादाचे बीज जाणीवपूर्वक रुजवण्याचे प्रयत्न झाले आहेत. २००६ नांदेड स्फोटापासून ते २६/११ पर्यंतच्या तपासापर्यंत धादांत खोटे कुभांड रचण्याचा कट तत्कालीन गृहमंत्र्यांसह अनेक राजकीय उच्चपदस्थांनी रचला होता.
  • महाराष्ट्रातील काही नेत्यांना महत्त्वाच्या दायित्वाचे मंत्रीपद मिळाले असतांना केवळ अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळे मालेगाव स्फोटाच्या प्रकरणी हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदूंची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र रचले होते.
  • त्या काळच्या काँग्रेस सरकारने समझोता एक्सप्रेस स्फोटातील खर्‍या आतंकवाद्यांना सोडून आणि निरपराध हिंदूंना गोवण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यातूनही हिंदु निर्दोष सुटले. कोणत्यांही मंत्र्यांनी मी लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप घेतला नाही; कारण ते सत्य लिहिले आहे.
  • कर्नल पुरोहित हे आतंकवादी संघटनांना शोधून त्यावर करवाई करत होते. त्यामुळे त्यांना मालेगाव स्फोटाच्या प्रकरणी खोट्या गुन्हा अडकवण्यात आले. आजही मी कर्नल पुरोहितांच्या बाजूने ठाम उभा रहाणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF