मॉडेलला ब्लॅकमेल करणार्‍या प्रॉडक्शन मॅनेजरला अटक !

मुंबई – २८ वर्षीय मॉडेल तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला आक्षेपार्ह छायाचित्र आणि चित्रफीती यांच्या आधारे ब्लॅकमेल करणारा प्रॉडक्शन मॅनेजर एकलव्यसिंग तक्षक (वय २७ वर्षे) याला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

१ वर्षांपूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपीने तो प्रॉडक्शन मॅनेजर असून एक लघुपट बनवत आहे आणि त्यासाठी अभिनेत्री म्हणून संधी देऊ, अशी बतावणी  मॉडेल तरुणीला केली. त्यानंतर तिची अश्‍लील छायाचित्रे काढून तो तिला ब्लॅकमेल आणि मारहाण करत असल्याची तक्रार तिने पोलिसांत केली होती.


Multi Language |Offline reading | PDF