आतंकवाद निर्मितीचे केंद्र असणार्‍या पाकिस्तानला नामशेष करा !

सातारा जिल्हाधिकार्‍यांकडे हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांंची निवेदनाद्वारे मागणी

जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – पाकिस्तान आतंकवाद्यांच्या माध्यमातून भारतावर कुरघोड्या करून सैनिकांचे बळी घेत आहे. आतंकवादी आणि पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना ठार मारणे, हा अघोषित युद्धाचाच एक भाग आहे. पाकिस्तानचे हे आव्हान भारतीय राज्यकर्त्यांनी तात्काळ मोडून काढणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रशासनाने जनभावना लक्षात घेऊन आतंकवाद निर्मितीचे केंद्र असलेल्या पाकिस्तानच्या विरोधात तातडीने कारवाई करून त्याला नामशेष करावे, अशी मागणी सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या वेळी बजरंग दलाचे संयोजक श्री. मुकुंदराव पंडित, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शुभम शिंदे, हिंदु महासभेचे कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सनातन संस्थेचे श्री. दीपक डाफळे आदी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF