परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्यावरील श्रद्धेमुळे कतरास येथील सौ. संजुषा सिंह यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. संजुषा सिंह यांचा सत्कार करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी) – प्रत्येक प्रसंगात स्थिर राहून सतत सेवारत असणार्‍या आणि ‘सर्व काही श्रीकृष्ण अन् परात्पर गुरु डॉ. आठवले करवून घेत आहेत’, असा भाव असणार्‍या कतरास, झारखंड येथील साधिका सौ. संजुषा सिंह यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा हिंदु जनजागृती समितीचे पूर्व-उत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी १६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी कुंभनगरी येथील सत्संग सोहळ्यात केली. एका सोहळ्यात पू. (सौ.) सुनीता खेेमका यांना संत घोषित केल्यानंतर सौ. सिंह यांनीही आध्यात्मिक उन्नती केल्याची आनंदवार्ता साधकांना देण्यात आली.

सौ. संजुषा सिंह यांचा मुलगा अपघातात गंभीर घायाळ झाला होता. त्या वेळी रुग्णालयात मुलाची काळजी घेतांना सौ. सिंह यांना आलेले अनुभव आणि अनुभूती त्यांनी या सोहळ्यात सांगितले. ‘अत्यंत कठीण प्रसंगातही गुरुमाऊली आणि श्रीकृष्ण कसे तारून नेतात’, या संदर्भातील अनुभूती सांगताना सौ. संजुषा सिंह यांना भावाश्रू अनावर झाले. ‘प्रत्येक प्रसंगात गुरु कशी काळजी घेतात’, हे ऐकून सर्व साधकांची श्रद्धा अधिक दृढ होऊन सर्वजण कृतज्ञताभावाने गुरुचरणी नतमस्तक झाले.

गुरूंवरील अपार श्रद्धेमुळेच सौ. संजुषा सिंह यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली ! – पू. नीलेश सिंगबाळ

पू. नीलेश सिंगबाळ

या वेळी पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘आजचा सोहळा आरंभ होण्यापूर्वी सौ. संजुषादीदी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या समवेत चर्चा करत असतांना त्यांचा भाव जागृत झाला होता. त्यांच्या डोळ्यांतून येणार्‍या पाण्यातही दैवी कण दिसत होते. गुरूंवरील त्यांच्या या अपार श्रद्धेमुळेच सौ. संजुषा सिंह यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.’’

गुरुदेवांशी मनातून संवाद साधण्याचा प्रयत्न करणार्‍या सौ. संजुषादीदी ! – पू. प्रदीप खेमका

पू. प्रदीप खेमका म्हणाले, ‘‘सेवेसाठी बाहेर जाणे आणि सर्वांना समवेत घेऊन सेवा करणे, हा सौ. संजुषादीदी यांच्यामधील प्रमुख गुण आहे. प्रत्येक मंगळवारी कतरास येथे होणार्‍या सत्संगाच्या नियोजनाची सेवा त्या करतात. त्या कोणत्याही प्रसंगात स्थिर असतात. गुरुदेवांवर त्यांची अतूट श्रद्धा आहे. गुरुदेवांना त्या स्थुलातून एकदाही भेटलेल्या नाहीत; पण त्या त्यांच्याशी मनातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.’’

गुरुदेवांंच्या चरणी अखंड स्थान मिळण्याची सौ. संजुषादीदी यांनी केलेली प्रार्थना !

सन्मान सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करतांना सौ. संजुषा सिंह म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांच्या कृपेमुळेच प्रत्येक अडचणीतून मला बाहेर काढणारे चांगले पती आणि साधना करणारी मुले मिळाली. आई-वडिलांसारखे गुरुदेव मिळाले. पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीताभाभी यांचा सहवास दिला. ‘गुरुदेव, तुम्हीच आमच्या हाताला घट्ट धरून ठेवावे. प्रत्येक सेवा तुम्हाला अपेक्षित अशी करवून घेऊन तुमच्या चरणी अखंड स्थान द्यावे’, अशी प्रार्थना करून संसाराचा सारा भार मी गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now