पुलवामा प्रकरणी ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची निदर्शने

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथे भारतीय वंशाच्या नागरिकांनी पुलवामामधील आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात येथील व्हिक्टोरिया संसदेबाहेर निदर्शने केली. त्यांनी ‘पाकने आतंकवाद्यांना समर्थन देऊ नये’, अशी मागणी करणारे फलक हातात धरले होते.

१. स्थानिक नगरसेवक इंताज खान यात सहभागी झाले होते. ते म्हणाले की, पाकने आतंकवाद्यांचे समर्थन बंद केले पाहिजे. तसेच खान यांनी हुतात्मा झालेल्यांच्या परिवारांना हानीभरपाई देण्याची मागणी केली.

२. लेबर पार्टीचे नेते बिल शॉटेन यांनी आक्रमणाचा निषेध केला. ‘आम्ही आतंकवादाच्या विरोधातील लढाईमध्ये भारताच्या समवेत आहोत’, असे ते म्हणाले.

३. येथील ‘हिंदु काऊंसिल ऑफ ऑस्ट्रेलिया’नेही या आक्रमणाचा निषेध केला.


Multi Language |Offline reading | PDF