(म्हणे) ‘पाकिस्तानसमवेत युद्ध पुकारण्याची आवश्यकता नाही !’ – विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम

लातूर – काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीला ‘काश्मीरला असलेला विशेष दर्जा’ कारणीभूत असून काश्मिरी जनतेला काश्मीर हे वेगळे राष्ट्र वाटत आहे. देशातील इतर नागरिक जोपर्यंत तेथे राहून मालमत्ता विकत घेत नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील परिस्थिती पालटणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर काश्मीरचा विशेष दर्जा काढून घ्यावा; मात्र लगेच पाकिस्तानसमवेत युद्ध पुकारण्याची आवश्यकता नाही, असे वक्तव्य विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी केले. लातूरमधील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशभरातील जनतेमध्ये पाकिस्तानविरुद्ध चीड पहायला मिळत असून त्यांच्याकडून ‘पाकिस्तानसमवेत युद्ध करा’, ‘पाकिस्तानला संपवून टाका’, अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF