(म्हणे) ‘पुलवामामध्ये ४० मारले,  टुंडलामध्ये ८० मारू !’

टुंडला (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून पुलवामा आक्रमणाचे समर्थन

राष्ट्रभक्त हिंदु युवकाला मारहाण !

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना येथे धर्मांधांकडून आतंकवाद्यांचे उघड समर्थन करून हुतात्म्यांचा अवमान केला जातो, हे लज्जास्पद ! अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवा, तसेच राज्यात असे किती देशद्रोही आहेत, हे शोधून काढले पाहिजे !
  • अशा बातम्या हिंंदुद्वेषी प्रसारमाध्यमे दडपतात, हे लक्षात घ्या !
  • या घटनांवर देशात असहिष्णुता वाढली असल्याचे म्हणणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, लेखक, पत्रकार, आदी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

टुंडला (उत्तरप्रदेश) – येथील शिवनगरमध्ये पुलवामा आतंकवादी आक्रमणाचे धर्मांधांकडून समर्थन करण्यात येत होते. तेव्हा नवीन शर्मा या तरुणाने त्यांना विरोध केल्यावर धर्मांधांकडून त्यांना घरात घुसून लाठी, काठी आणि लोखंडी सळ्या यांनी मारहाण केली. तसेच ‘पुलवामा मध्ये ४० मारले, येथे ८० जणांना मारू’ अशी धमकी दिली. या वेळी शर्मा यांच्या आईने त्यांना विरोध केल्यावर तिला धर्मांधांनी बंदुकीचा धाक दाखवला. या प्रकरणी नदीम, अल्ताफ, आलीशान आणि मुन्ना यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF