हुतात्मा पोलिसाच्या पार्थिवासमवेत भाजपचे केंद्रीयमंत्री के.जे. अल्फोन्स यांनी  ‘सेल्फी’ काढले !

  • ४० च्या बदल्यात पाकच्या ४ सहस्र सैनिकांना ठार करून त्यांच्या मृतदेहांसमवेत ‘सेल्फी’ काढण्याचा प्रयत्न भाजपचे मंत्री का करून दाखवत नाहीत ?
  • भाजप सरकारमधील अशा मंत्र्यांवरून सरकार हुतात्मा सैनिकांच्या संदर्भात किती असंवेदनशील आहे, हे लक्षात येते ! असे मंत्री सामान्य नागरिकांशी कसे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

नवी देहली – भाजप सरकारमधील केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे. अल्फोन्स यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पुलवामा येथील आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस व्ही.व्ही. वसंतकुमार यांच्या पार्थिवासमवेत काढलेले ‘सेल्फी’ (स्वतःचे स्वतःच छायाचित्र काढणे) ‘अपलोड’ केले होते. यावरून त्यांच्यावर टीका झाल्यावर यांनी ते काढले आहेत. हुतात्मा वसंतकुमार यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी वायनाड येथे नेण्यात आले होते. तथे अल्फोन्स यांनी वसंतकुमार यांचा पार्थिव देह ठेवलेल्या शवपेटीकडे पाठमोरे उभे राहून ‘सेल्फी’ काढले. या छायाचित्राखाली त्यांनी, ‘गुडबाय शहीद वसंतकुमार. आम्ही तुमच्यामुळे जिवंत आहोत’, असे लिहिले आहे. (हुतात्मा पोलिसांविषयी मंत्री महाशयांना एवढे वाटत होते, तर ते त्यांच्या कृतीतून दिसणे अपेक्षित होते ! अंत्यसंस्कारासाठी पोलिसाचा पार्थिव देह ठेवला असतांना संवेदनशून्य कृती करणार्‍या अशा मंत्र्यांच्या या लिखाणावर कोण विश्‍वास ठेवणार ?  – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now