सैनिकांची हत्या करणार्‍यांवर कारवाई न केल्यास आम्ही कारवाई करू ! – इराणची पाकला चेतावणी

अशी चेतावणी भारताने कधी पाकला इतक्या वर्षांत दिली आहे का ? इराणकडून भारत काही शिकेल का ?

तेहरान – इराण-पाकच्या सीमेवर १३ फेब्रुवारीला पाकमधील आतंकवाद्यांनी इराणच्या २७ रिव्होल्यूशनरी सुरक्षारक्षकांची आत्मघाती आक्रमणाद्वारे हत्या केली होती. यावर इराणने पाकला चेतावणी देतांना म्हटले आहे की, ‘पाकने या आतंकवाद्यांवर कारवाई करावी अन्यथा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे आतंकवाद्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही सैनिकी कारवाई करण्यासाठी तत्पर आहोत.’ पाकमधील आतंकवादी संघटना ‘जैश-अल-अदल’कडून हे आक्रमण करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF