भारताकडून पाकला दिलेला ‘सर्वाधिक आवडते राष्ट्र’ हा दर्जा रहित

  • पावणे पाच वर्षांनंतर आणि शेकडो सैनिक हुतात्मा झाल्यावर पाकला लाभदायक ठरणारा केवळ एक दर्जा रहित करणारे भाजप सरकार काय कामाचे ? आतंकवाद पोसणार्‍या पाकच्या विरोधात मंदगतीने हालचाली करणारे भाजप सरकार पाकचा निःपात काय करणार ?
  • पाकला धडा शिकवण्यासाठी भारत त्याला ‘आतंकवादी देश’ घोषित करून त्याच्या विरोधात युद्ध का पुकारत नाही ?

‘सर्वाधिक आवडते राष्ट्र’ दर्जाचा पाकच्या व्यापार्‍यांना लाभ होत होता !

‘सर्वाधिक आवडते राष्ट्रा’चा (‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा) दर्जा मिळाल्याने पाकिस्तानला व्यापारात सवलती मिळाल्या होत्या. पाकच्या व्यापार्‍यांना किमान निर्यात शुल्क आणि विभिन्न व्यापारी करांमध्ये सूट मिळाली होती. यामुळे भारतापेक्षा पाकिस्तानमधील व्यापार्‍यांचा अधिक लाभ झाला होता. (काँग्रेसने हा दर्जा दिला आणि भाजपने तो तसाच चालू ठेवला, म्हणजे दोन्ही राजकीय पक्ष पाकची भरभराट करत होते, हे लक्षात घ्या ! – संपादक)

नवी देहली – काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावरील आक्रमणानंतर भारताने पाकला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा (सर्वाधिक आवडते राष्ट्रचा) दर्जा काढून घेतला आहे. वर्ष १९९६ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने व्यापारानिमित्त पाकला हा दर्जा दिला होता. (काँग्रेसने सत्तेवर असतांना आतंकवादाच्या विरोधात काही केले नाहीच उलट आतंकवाद कशा प्रकारे पोसला, याचे हे उदाहरण होय ! – संपादक)

पुलवामा येथील आक्रमणानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या झालेल्या संरक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन्, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. (पाकला दिलेला विशेष दर्जा रहित करण्यासाठी पावणे पाच वर्षे घेणारे भाजप सरकार कधी तरी पाकचा निःपात करणार का ? – संपादक)

याविषयी अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला सर्व स्तरांवर एकटे पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून कठोर पावले उचलण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. (हे करण्यासाठी इतकी वर्षे का लागली आणि यात नवीन काय आहे ? – संपादक) आतंकवादाला पाठबळ देणार्‍यांना याचे मोठे मूल्य चुकवावे लागेल. (म्हणजे काय करणार ? ‘अर्थमंत्र्यांना केवळ मूल्याच्याच गोष्टींत बोलण्याची सवय आहे; मात्र प्रत्यक्षात ते काहीही करत नाहीत’, असेच जनतेला वाटते ! अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना संसदेवर झालेल्या आक्रमणानंतर त्यांनी ‘आरपारचे युद्ध होईल’ अशी गर्जना केली होती; मात्र त्यांनीही नंतर पाकसमोर गुडघे टेकले होते, हे जनता विसरलेली नाही ! – संपादक) गृहमंत्री राजनाथ सिंह हे श्रीनगरला जाणार असून ते सुरक्षेचा आढावा घेतील. (‘आतंकवादाच्या विरोधात आम्ही काही तरी करत आहोत, हे दाखवण्याची ही जनतेच्या डोळ्यांत धूळफेक तर नव्हे ? – संपादक)

युरोपियन कमिशनने पाकला काळ्या सूचीत टाकले !

नवी देहली – युरोपियन युनियनचा भाग असणार्‍या ‘यूरोपियन कमिशन’ने आर्थिक अपव्यवहार आणि आतंकवाद्यांना अर्थपुरवठा होण्यापासून रोखण्यासाठी पाकला आणि अन्य काही देशांना काळ्या सूचीमध्ये टाकले आहे. याला या कमिशनमधील काही सदस्य राष्ट्रांनी विरोधही केला आहे. (असे करून ही राष्ट्रे आतंकवादाला एक प्रकारे खतपाणीच घालत आहेत ! – संपादक) पाकिस्तानसह अफगाणिस्तान, इथियोपिया, ईराण, श्रीलंका, सिरीया, त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो, ट्युनिशीया, लिबिया, बोत्सवाना, घाना, बहामास आणि येमेन यांना काळ्या सूचीत टाकण्यात आले आहे. यामुळे हे देश युरोपातील देशांशी व्यापार करू शकणार नाहीत. तसेच या देशांतील व्यापार्‍यांना युरोपीय देशांकडून कर्जही मिळणार नाही. ही सूची अद्याप २८ देशांच्या कमिशनच्या सभेत संमत झालेली नाही. यावर चर्चा होऊन मतदान होणार आहे. तरीही ‘ही सूची संमत होईल’, असा विश्‍वास कमिशनकडून व्यक्त करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF