युरोपमधील ऑस्ट्रिया देशातील मुली धर्मांध शरणार्थींकडून होणारा त्रास टाळण्यासाठी रस्त्याने जातांना हिजाब घालतात !

  • भारतात असे होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्र स्थापा !
  • युरोपमधील अनेक देशांत धर्मांधांची संख्या नगण्य होती; मात्र आता शरणार्थींमुळे ती वाढल्याने त्यांचा त्रास कसा होतो, ते आता या देशांना समजायला लागले आहे ! हा त्रास गेली १ सहस्र २०० वर्षे भारत कसा सहन करत आहे आणि त्याचे यामुळे किती तुकडे झाले, हे आता त्यांच्या लक्षात येईल !
  • युरोपातील देशांना धर्मांधांमुळे होणार्‍या या त्रासांविषयी भारतातील एकही निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाही, हे लक्षात घ्या !

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) – शहरातील युरोपियन मुली सिरीया, इराक इत्यादी युद्धप्रवण देशांतून आलेल्या धर्मांध शरणार्थी तरुणांकडून होणारे विनयभंग, आक्रमण, लैंगिक आशयाचे टोमणे मारणे अशा त्रासांपासून वाचण्यासाठी रस्त्याने जातांना हिजाब घालून चालतात. त्यामुळे ‘या मुली मुसलमान आहेत’, असे समजून हे शरणार्थी त्यांना त्रास देत नाही, असे विधान ऑस्ट्रियामधील माजी खासदार डॉ. मार्कस फ्रांझ यांनी एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देतांना केले.

१. मार्कस फ्रांझ म्हणाले, ‘‘मी डॉक्टर असल्याने माझा समाजातील नागरिकांशी जवळून संबंध येतो. मी रस्त्यावर चाललेल्या अनेक महिला, मुले, तरुण मुली आणि त्यांचे पालक यांच्याशी बोलतो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धप्रवण देशांतून शरणार्थी येण्याआधी देशात जी निर्भयता होती ती आता न्यून झाली आहे. ख्रिस्ती तरुणींवर त्यांच्या केशरचनेवरून, रंगावरून, वागणुकीवरून अनेक धर्मांध तरुण टोमणे मारतात. त्यामुळे या मुली भयभयीत होतात. हे धर्मांध तरुण अनेक मुलींना निर्लज्जपणे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव देतात.

२. अशीच परिस्थिती जर्मनी आणि स्वीडन या देशांतही आहे. या देशांतही फार मोठ्या प्रमाणावर धर्मांध शरणार्थी आले आहेत. स्थानिक महिलांना होणार्‍या त्रासांविषयी या देशातील शासनाला कल्पना आहे; मात्र शासन या धर्मांध शरणार्थींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे सोडून त्यांच्या नागरिकांनाच कुठले प्रतिबंधक उपाय योजावेत, याची माहिती विज्ञापनांद्वारे देत आहेत.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now