धुळे येथे होणार्‍या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’निमित्त पत्रकार परिषद !

डावीकडून कु. रागेश्री देशपांडे, बोलतांना श्री. प्रशांत जुवेकर, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि श्री. पंकज बागुल

धुळे, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, १७ फेब्रुवारी या दिवशी येथील गिंदोडीया कंपाऊंड येथे सायंकाळी ६ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त १४ फेब्रुवारीला पत्रकार भवन, साक्री रोड येथे पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेला सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, कु. रागेश्री देशपांडे आणि श्री. पंकज बागुल यांनी संबोधित केले.

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे, तसेच धर्मशिक्षण, धर्माचरण, धर्मरक्षण यांद्वारे हिंदूंना संघटित करणे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन केले जाते. हिंदु जनजागृती समितीसह सनातन संस्था गेल्या १६ वर्षांपासून राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यांसाठी अखंड कार्यरत असून आजवर समितीच्या वतीने देशभरात सहस्रो सभांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे.’’

समितीचे श्री. पंकज बागुल यांनी सांगितले की, सभेच्या प्रसारात धुळे शहरातील युवावर्ग उत्साहात सहभागी होत असून सर्वजण सभेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे म्हणाल्या की, सभेचा २५ हून अधिक गावांत प्रसार झाला आहे. शहर आणि ग्रामीण भागात ६० हून अधिक बैठका घेऊन सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणीवर्ग येथेही प्रसार झाला आहे. रिक्शातून उद्घोषणा करणे, स्थानिक वृत्तवाहिन्या, डिजिटल होर्डिंग, सामाजिक प्रसारमाध्यमे, भित्तीपत्रके, हस्तपत्रके या माध्यमांसह घरोघरी जाऊनही सभेचा प्रसार करण्यात येत आहे.

आज भव्य वाहनफेरीचे आयोजन !

सभेचा विषय शहरातील हिंदु बांधवांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने अधिकाधिक हिंदूंनी सभेला उपस्थित रहावे, यासाठी शुक्रवार, १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वा. भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. फेरीला एकवीरा मंदिरापासून आरंभ होईल. श्री एकवीरा मंदिर – जुने धुळे – पंच कंदील – या मार्गाने फेरी जाऊन महाराज अग्रसेन पुतळ्याजवळ फेरीची सांगता होईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now