भारत विश्‍वगुरु बनण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ होणे आवश्यक आहे ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

नांदुरा (जिल्हा बुलढाणा) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

डावीकडून दीपप्रज्वलन करतांना पू. अशोक पात्रीकर, सौ. क्षिप्रा जुवेकर, श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल आणि श्री. श्रीकांत पिसोळकर

नांदुरा (जिल्हा बुलढाणा) – भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे का आवश्यक आहे ? भारताला त्याच्या सीमा वाढवायच्या नाहीत, तर भारत विश्‍वगुरु बनण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत, असे प्रतिपादन लष्कर-ए-हिंदचे राष्ट्र्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी नांदुरा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये केले. १० फेब्रुवारीला झालेल्या सभेला ६०० धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बुलढाणा जिल्ह्यातील ही पहिलीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा असूनही या सभेला नांदुरावासियांचा उत्स्फूर्त सहभाग होता, तसेच युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘सध्याच्या हिंदु युवतींचे धर्मांतर होण्यास ‘लव्ह जिहाद’ कसा कारणीभूत आहे’, याविषयी प्रबोधन केले. तसेच हिंदु संस्कृतीनुसार औक्षण करून वाढदिवस साजरा करणे, टिळा लावणे, महिलांनी कुंकू लावणे याचे महत्त्वही या वेळी लक्षात आणून दिले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि आगामी दिशा’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभास्थळी सनातनचे ग्रंथप्रदर्शन, तसेच पनून कश्मीरनिर्मित प्रदर्शनही लावण्यात आले होते. सभेचे सूत्रसंचालन श्री. प्रतिक भाकरे आणि कु. निधी बैस यांनी केले, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा श्री. जितेंद्र मोरे यांनी सांगितला. सभेचा आरंभ वेदमंत्रपठण करून झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सभेला सनातनचे पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती होती.

सहकार्य – नांदुरा येथील शक्ती डेकोरेशनचे मालक श्री. राजेश पांडे यांनी सभेसाठी विनामूल्य साहित्य उपलब्ध करून दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now