हिंदु राष्ट्राची शीघ्रातीशीघ्र स्थापना होण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘राजमातंगी याग’ !

यागाचा संकल्प करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी (फोंडा) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची शीघ्रातीशीघ्र स्थापना व्हावी, या कार्यात सहभागी असलेल्या साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, तसेच सर्वांचे आयुष्यवर्धन व्हावे, असा संकल्प करून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १३ फेब्रुवारी २०१९ या दिवशी संतांच्या वंदनीय उपस्थितीत अन् भावपूर्ण वातावरणात ‘राजमातंगी याग’ करण्यात आला.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते संकल्प करून विविध धार्मिक विधी करण्यात आले. यज्ञाचे पौरोहित्य ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दामोदर वझेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी केले. यज्ञाला सनातनच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. यागाच्या तीर्थाने २१ आम्रपल्लवांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर अभिषेक करण्यात आला.

श्रीविष्णूच्या आकर्षण शक्तीला ‘राजमातंगी’ म्हटले आहे. राजमातंगीदेवी विशुद्धचक्राचीही अधिदेवता आहे. विशुद्धचक्र हे वाणीशी संबंधित आहे. मुंडकमाला या पौराणिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आढळतो की, जसे महाविष्णूचे १० अवतार आहेत, तसेच दुर्गादेवीची ‘दशमहाविद्या’ अशी १० रूपे आहेत. विष्णूच्या प्रत्येक अवताराच्या वेळी दशमहाविद्यांपैकी एक देवी अवतारकार्यात साहाय्य करते. असुरांचे वशीकरण करून त्यांचे निर्दालन करणे, हे राजमातंगीदेवीचे कार्य आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now