‘कॅथलिक’ नंतर आता अमेरिकेतील ‘प्रोेटेस्टंट’च्या बॅप्टीस्ट चर्चमध्ये लैंगिक शोषण

  • परदेशांतील चर्चमधील विकृतीच्या विरोधात पुरो(अधो)गामी मौन का बाळगतात ?
  • भारतातील प्रसारमाध्यमे अशा बातम्या जाणीवपूर्वक दडपतात आणि हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांवरून त्यांची अपकीर्ती करतात !
  • जगभरात बहुतांश चर्चमध्ये अशी कुकृत्ये घडत असतांना त्यांना ‘अनाचाराचे अड्डे’ म्हटल्यास चूक ते काय ?
  • हिंदूंना बाटवून ख्रिस्तीबहुल झालेल्या ईशान्य भारतातील राज्यांमधील, तसेच गोवा, केरळ आदी राज्यांतील चर्चमध्ये काय चालते, याची चौकशी करण्याची मागणी कोणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

शिकागो – अमेरिकेमध्ये टेक्सास आणि पेन्सिलव्हेनिया येथील कॅथलिक चर्चमधील पाद्री आणि बिशप यांच्याकडून महिला, नन आणि मुले यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाची माहिती उघड झाल्यानंतर आता येथील ख्रिस्त्यांच्या सर्वांत मोठ्या असणार्‍या प्रोटेस्टंट संप्रदायाच्या ‘सदर्न बॅप्टीस्ट कन्वेन्शन’च्या चर्चमध्ये मोठ्या संख्येने लैंगिक शोषण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. वर्ष १९९८ पासून आतापर्यंत ७०० हून अधिक पीडितांची माहिती समोर आली आहे. टेक्सासमधील २ वर्तमानपत्रांत ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. चर्चमधील ३८० प्रमुख आणि स्वयंसेवक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. पीडितांमध्ये सर्वाधिक ३ वर्षांची मुले आहेत. आरोपींपैकी अनेक जण अजूनही चर्चमध्ये कार्यरत आहेत.

१. या वृत्तात असेही म्हटले आहे की, चर्चच्या अधिकार्‍यांच्या माहितीनुसार पीडितांची संख्या वाढूही शकते. तसेच त्यांनी ‘अजून कोणी पीडित असेल, तर त्यांनी त्याची माहिती द्यावी’, असे आवाहनही केले आहे.

२. गेल्या २ दशकांत ३५ प्रकरणांतील आरोपी एक चर्च सोडून दुसर्‍या चर्चमध्ये काम करण्यासाठी गेले आहेत. यांतील काही प्रकरणांची माहिती कन्वेन्शनला होती. (प्रकरणे ठाऊक असतांनाही अशी कुकृत्ये करणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. यावरून अशी प्रकरणे झाकण्याकडेच कल होता, हे स्पष्ट होते ! – संपादक)

३. प्रोटेस्टंट संप्रदायाची अमेरिकेत ४७ सहस्र चर्च आहेत. तसेच याचे दीड कोटी सदस्य आहेत. या घटनेवर पुढील मासात सदर्न बॅप्टीस्ट चर्चच्या अध्यक्षांकडून अधिक माहिती दिली जाणार आहे.

४. व्हॅटिकनच्या तुलनेत सदर्न बॅप्टीस्ट कन्वेन्शन त्यांच्या अखत्यारीत असलेल्या चर्चना स्वतंत्रपणे काम करण्याची अनुमती देते. तसेच त्यांच्या मंत्र्यांची तेथे नियुक्ती करते. हे मंत्री किंवा तेथील कर्मचारी अविवाहित असण्याची आवश्यकता नसते. तसेच येथे कोणी बिशप नसतो किंवा निरीक्षक नसतो.


Multi Language |Offline reading | PDF