व्हॅटिकनमधील पोप यांच्या विश्‍वासातील ८० टक्के पदाधिकारी समलिंगी ! – फ्रेंच पत्रकाराच्या पुस्तकात दावा 

पोप फ्रान्सिस यांनी जगभरातील बहुतांश चर्चमध्ये पाद्य्रांकडून होणार्‍या लैंगिक शोषणावरून क्षमा मागितली होती, आता ते याविषयी काही बोलतील का ?

व्हॅटिकन (रोम, इटली) – जगभरातील कॅथलिक ख्रिस्त्यांचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनमध्ये पोप यांच्या विश्‍वासातील पदाधिकार्‍यांपैकी ४ – ५ जण म्हणजे ८० टक्के पदाधिकारी समलिंगी आहेत, असा दावा फ्रेंच पत्रकार आणि लेखक फेडरिक मार्टेल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. १३ फेब्रुवारीला व्हॅटिकनमध्ये जगभरातील सर्व बिशप यांची चर्चमध्ये होणार्‍या लैंगिक शोषणावर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होेती. त्या पार्श्‍वभूमीवर ही माहिती समोर आली.

१. फेडरिक मार्टेल यांनी ५७० पानांचे हे पुस्तक लिहिण्यासाठी जगभरातील १ सहस्र ५०० व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांत ४१ कार्डिनल, ५२ बिशप, ४५ विदेशी राजदूत, ११ स्विस सुरक्षा सैनिक आणि २०० पाद्री यांचा समावेश आहे. हे पुस्तक जगभरातील ८ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले असून २० देशांत प्रकाशित झाले आहे.

२. जन्मभर ब्रह्मचर्यव्रत पाळण्याची शपथ घेतलेले पाद्री केवळ लहान मुले आणि नन्सचेच लैंगिक शोषण करत नसून मोठ्या माणसांशीही शारीरिक संबंध ठेवत आहेत, हे उघडकीस आल्यावर चर्चची प्रतिमा अधिकच मलीन झाली आहे. (तरीही भारतातील प्रसारमाध्यमे ख्रिस्ती भांडवलदारांच्या कह्यात असल्याने अशा बातम्या प्रसारित करत नाहीत ! भारतात भाजप सरकार, प्रशासन आणि पोलीस यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात सौम्य धोरण स्वीकारल्यामुळे ते भारतात पूर्ण क्षमतेने हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF