सनातनच्या प्रदर्शनातून हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांची उन्नती होईल ! – श्री बलदेवाचार्यजी महाराज, राजस्थान

कुंभमेळा प्रयागराज २०१९

१. श्री बलदेवाचार्यजी महाराज यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), १३ फेब्रुवारी (वार्ता.) – मी ईश्‍वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो की, राष्ट्र आणि हिंदु धर्म विकसित होण्यासाठी हिंदूंनी गांभीर्याने चिंतन करून पुढे जायला हवे. धर्मप्रसाराची सेवा झोकून देऊन केल्यास साधकांना मोठे फळ मिळेल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांची उन्नती होईल, असे प्रतिपादन राजस्थान येथील श्री दाऊजीधाम खालसा आणि श्री बाहुबलद्वाराचार्य पीठाधीश्‍वर श्री बलदेवाचार्यजी महाराज यांनी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेले ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला श्री बलदेवाचार्यजी महाराज यांनी भेट दिल्यावर ते बोलत होते. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ग्रंथ प्रदर्शनाची माहिती दिली. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी श्री बलदेवाचार्यजी महाराज यांचा सन्मान करून त्यांना हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘गंगाजी की महिमा’ हा ग्रंथ भेट दिला.


Multi Language |Offline reading | PDF