कृष्णनीती वापरून जनतेला जागृत करावे लागेल ! – श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज

कुंभमेळा प्रयागराज २०१९

श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज (डावीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना श्री. चेतन राजहंस

प्रयागराज (कुंभनगरी), १३ फेब्रुवारी (वार्ता.)  सध्या मुसलमान आणि ख्रिस्ती हिंदूंना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व कायदे केवळ हिंदूंसाठी आहे. त्यांच्यासाठी कायदे नाहीत, अशी स्थिती भारतात आहे. आता आपल्याला कृष्णनीती वापरून जनतेला जागृत करावे लागेल, असे प्रतिपादन हरिद्वार येथील कनखल मधील श्री पंचायती निर्मला आखाड्याचे श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला.

महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराजे पुढे म्हणाले की, सनातन संस्थेच्या माध्यमातून चांगले कार्य होत आहे. ही संस्कृती आपली वैदिक सनातन संस्कृती आहे. या प्रदर्शनातून सनातन धर्माची माहिती सर्वसामान्यांना सहज समजेल, अशी आहे. आम्ही निर्मल आखाड्याच्या अध्यक्षतेखाली पाच प्रदेशांत हिंदु जनजागृती यात्रा काढल्या आहेत. आम्हीही २५ वर्षांपासून हेच कार्य करत असल्याने मी तुमच्या समवेत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now