महसूलबुडव्या आणि अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्‍वभूमी लाभलेला गोव्यातील ‘ईडीएम्’ महोत्सव रहित करा !

‘प्राईम् एन्काऊंटर’मध्ये हिंदु जनजागृती समितीचे गोविंद चोडणकर यांच्याकडून पुनरुच्चार !

डावीकडे श्री. गोविंद चोडणकर आणि मुलाखत घेतांना श्री. रूपेश सामंत

पणजी, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – महसूलबुडव्या आणि अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्‍वभूमी लाभलेला ‘ईडीएम्’ महोत्सव आणि त्यासाठी ‘सनबर्न क्लासिक’ला दिलेली मान्यता शासनाने रहित करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केली. ‘प्राईम् टीव्ही गोवा’ वृत्तवाहिनीवरील ‘प्राईम् एन्काऊंटर’ या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री. रूपेश सामंत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी त्यांनी हे विधान केले.

वागातोर येथे २३ आणि २४ फेब्रुवारी या कालावधीत ‘सनबर्न क्लासिक’ हा ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’ होत आहे. महसूलबुडव्या आणि अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्‍वभूमी लाभलेला ‘ईडीएम्’ महोत्सव शासनाने रहित करावा, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आंदोलन छेडले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘प्राईम् एन्काऊंटर’ या ११ फेब्रुवारीच्या सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांची मुलाखत घेण्यात आली. ‘प्राईम् एन्काऊंटर’ हा या वृत्तवाहिनीवरील पहिला कार्यक्रम होता.


Multi Language |Offline reading | PDF