हिंदूंनो, ब्रिटिशांचे उच्छिष्ट खाण्यापेक्षा (विविध ‘डे’ साजरे करण्यापेक्षा) महान हिंदु संस्कृतीचा आदर्श ठेवून तिचे पालन करा !

‘हिंदूंनो, आपल्याला पूर्वजांनी मकरसंक्रांत, होळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दीपावली असे वैशिष्ट्यपूर्ण सण कसे साजरे करावेत, हे दाखवून दिले आहे; परंतु आपण १ जानेवारीला नववर्षारंभ, प्रेमिकांचा दिवस (व्हॅलेंटाईन डे), ‘मदर्स-डे’, ‘चॉॅकलेट डे’, असे अनेक विकृत ‘डे’ साजरे करू लागलो आहोत. हे विविध ‘डे’ वासना, कामांधता, विकृती, अश्‍लीलता आणि अनैतिकता दर्शवतात. ही सर्व सुखे क्षणिक आहेत. अशा प्रकारे अधर्माचरण केल्याने चारित्र्यहनन होते, चंगळवाद बोकाळतो, कामांधता वाढते अणि अनेक अपप्रवृत्तींना खतपाणी मिळते.

तरुण मुले-मुली एकत्र राहून ‘१४ फेब्रुवारी’ हा प्रेमिकांचा दिवस साजरा करतात. या दिवशी ते एकमेकांना भेटवस्तू आणि फूल अथवा ‘पार्टी’ देऊन प्रेम व्यक्त करतात.

१. पालकांच्या योग्य-अयोग्य पद्धतीचे आचरण करणारी मुले !

तुम्ही २६ व्या वर्षी प्रेमिकांचा दिवस साजरा केला असेल, तर तुमची मुले १६ व्या वर्षीच तो साजरा करतील. आपल्यात अनैतिकता ४० टक्के असली, तर मुलांमध्ये ती ७० टक्के झालेली असते. लक्षात ठेवा, तुमची मुले तुमच्यापेक्षा सर्वच गोष्टींत पुढे जात आहेत. तुम्ही धर्माचरण करत असलात, तर तुमची मुले तुमच्या पुढे जाऊन धर्माचरण करतील. तुम्ही अनैतिकतेने वागलात, तर पुढची पिढीही अनैतिक निपजेल.

२. हिंदूंनो, क्रांतीकारकांनी देशासाठी केलेला त्याग आठवा !

२ अ. क्रांतीकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले असणे : हिंदूंनो, आपल्या क्रांतीकारकांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले. क्रांतीकारक देशासाठी फासावर चढले, स्वतःचे घरदार हरवून बसले, तेव्हा लहानलहान मुलेसुद्धा रस्त्यावर उतरली. त्यांनी हा त्याग ‘आपण अनैतिक आचरण करावे’, यासाठी केला होता का ?

ब्रिटिशांनी देशात अनैतिकता पसरवण्यास आरंभ केला, तेव्हा आपल्या संस्कृतीवर होणार्‍या घोर अन्यायाची जाणीव होऊन क्रांतीकारक त्याविरुद्ध लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरले. काही क्रांतीकारकांनी आपले प्राण गमावल्यानंतरच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवे.

२ आ. भारतीय संस्कृती जपली जाण्यासाठी पूर्वजांनी सण साजरे करणे आणि त्यात ब्रिटिशांनी विघ्ने आणल्यामुळे क्रांतीकारकांनी एकत्र येऊन उठाव करणे : क्रांतीकारकांनी भारत देश स्वतंत्र करण्यामागे विशिष्ट उद्देश ठेवला होता. आपण आपल्या देशात पुरातन काळापासून जे सणवार साजरे करत आलो आहोत, ते त्याच पद्धतीने ते साजरे व्हायला हवेत. सणावारी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आल्यावर देश आणि धर्म यांविषयी बोलायचे. यांतूनच देशप्रेम जागृत होऊन कौटुंबिक सलोखा राखला जायचा. क्रांतीकारकांना ठाऊक होते की, आपली संस्कृती ही विश्‍वातील एकमेव अशी महान संस्कृती आहे. ती जपली जाण्यासाठी आपले पूर्वज सण साजरे करायचे, तसेच धर्माचरणही करायचे. ब्रिटिशांनी यात विघ्ने आणण्यास आरंभ करताच क्रांतीकारकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला.

३. भारतीय संस्कृती, क्रांतीकारकांचा त्याग, तसेच आई-वडिलांनी केलेले पालनपोषण विसरून प्रेमिकांचा दिवस साजरा करणे म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यापेक्षाही नीच वृत्तीचे प्रदर्शन करणे

हिंदूंनो, प्रेमिकांचा दिवस कोणती संस्कृती मनावर ठसवतो ? त्यातून तुमच्यापुढे कोणता आदर्श निर्माण होतो ? याचे उत्तर तुमच्याकडे आहे; परंतु ते द्यायला तुम्हाला लाज वाटते. प्रेमिकांचा दिवस म्हणजे ‘एकमेकांना सोडून दुसरे कोणीच नाही, सर्वस्व तेच, त्यांच्यासाठीच जन्म’, अशा मूढ भ्रमात असणारे प्रेमी त्या दिवशी भेटतात.  देवाने तुम्हाला का निर्माण केले  आहे ? भारताची संस्कृती, क्रांतीकारकांचा त्याग, तसेच आई-वडिलांनी केलेले पालनपोषण सर्व विसरून आपण प्रेमिकांचा दिवस साजरा करत आहोत. एक म्हण आहे, ‘पिसाळलेले कुत्रे त्याच्या मालकाला कधीच चावत नाहीत’; पण इथे मनुष्य कुत्र्यापेक्षाही नीच झाला आहे.

१४ फेब्रुवारीला हिंदू प्रेमिक आई-वडिलांना विसरून त्यांच्या मनाविरुद्ध वागतात. त्या क्षणिक सुखासाठी आत्महत्येलाही प्रवृत्त होतात. प्रेमिकांचा दिन हाच आदर्श देतो ना ? या प्रश्‍नाला निर्लज्ज लोक ‘हो’ असे उत्तर देतात. मूर्ख हिंदू प्रेमिकांनो, तुम्ही चारित्र्यहीन व्हायचे टाळणार असाल, तर १४ फेब्रुवारी हा दिवस साजरा करणे सोडून द्या आणि तो साजरा करणार्‍यांचे प्रबोधन करून त्यांनाही त्यातून मुक्त करा, तरच तुमच्या जन्माचे सार्थक होईल.’

– एक साधक     


Multi Language |Offline reading | PDF