- भाजपच्या राज्यात हिंदू, त्यांची घरे आणि मंदिरे असुरक्षित !
- काँग्रेस आणि भाजप यांच्या राज्यात काही भेद नसल्याने हिंदूंनी आता धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हावे !
करीमगंज (आसाम) – येथील बराक खोर्यामधील दोहलिया भाग १ मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या काही घरांना आगी लावण्यासह मंदिरांची तोडफोड आणि मूर्तींचे भंजन केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे येथे तणावपूर्ण स्थिती असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
५ फेब्रुवारीला आसाममधील पाथरकांदी शाळेतील अरबी शिक्षक मौलाना महबूब याने एका हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या घटनेमुळेच धर्मांधांनी उपरोक्त प्रकार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.