हिंदुत्वनिष्ठांच्या वारंवार होणार्‍या हत्यांचे ‘सीबीआय’द्वारे सखोल अन्वेषण करण्याची हिंदूंची एकमुखी मागणी !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने शासनाला द्यावयाची निवेदने

देशात विविध ठिकाणी होत आहेत राष्ट्रीय हिंदू आंदोलने !

१०० कोटी हिंदूंच्या देशात अशी मागणी करावी लागणे, ही हिंदू तसेच सरकार यांच्यासाठी लांच्छनास्पदच गोष्ट होय ! यावर हिंदुहिताचा विचार करणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे जाणा !

हिंदुत्वनिष्ठांच्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या हत्यांचे अन्वेषण करून आक्रमणकर्त्यांची पाळेमुळे खणून काढावीत, यासाठीचे निवेदन येथे देत आहोत.

                                                                                                                                                    दिनांक :

प्रति,

माननीय केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार, नवी देहली ११०००१.

विषय : कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथील हिंदु नेत्यांवर होणारी आक्रमणे अन् निर्घृण हत्या यांमागील षड्यंत्राचे ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल अन्वेषण करण्यासंदर्भात…

महोदय,

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना वेचून, पाळत ठेवून ठार मारणे, अशा घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतेच कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथे सत्तांतर झाल्यानंतर हिंदु नेत्यांच्या हत्या अन् त्यांच्यावर होणारी आक्रमणे या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मध्यप्रदेशमध्ये गेल्या मासात केवळ २ दिवसांत ४ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यात आल्या.

 या संदर्भात आम्ही लक्षात आणून देऊ इच्छितो …

१. भोपाळ (मध्यप्रदेश) येथे भाजपचे नगरपालिका अध्यक्ष प्रल्हाद बंदवार यांची अज्ञात बंदूकधार्‍यांनी डोक्यात गोळी घालून हत्या केली. अन्वेषण पूर्ण होण्याच्या अगोदरच जमिनीच्या विवादातून ही हत्या करण्यात आली आहे, असा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात येत आहे.

२. मध्यप्रदेशच्या मंदसौर येथे बडवानीमध्ये भाजप नेत्यांची हत्या करण्यात आल्यावर रतलाममध्ये भाजप कार्यकर्ता तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी हिंमत पाटील यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यांची हत्या केल्यानंतर चेहराही जाळून टाकण्यात आला. या घटना ताज्या असतांनाच भाजपचे कार्यकर्ता श्री. मनोज ठाकरे यांचीही अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली.

३. ३० जुलै २०१८ या दिवशी केरळ राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३४ वर्षीय कार्यवाह राजेश यांची साम्यवादी कार्यकर्त्यांनी चाकूने भोसकून हत्या केली. राजेश यांची हत्या करण्यापूर्वी त्यांचे हात कापण्यात आले, तर त्यांच्या शरिरावर १५ वार करण्यात आले होते. ही हत्या सीपीआय (एम्) पक्षाच्या गुंडांनी केली.

४. जुलै २०१७ मध्ये कर्नाटक राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते शरद मडीवाला (वय २८ वर्षे) यांची हत्या करण्यात आली. १६ ऑक्टोबर २०१६ या दिवशी रा.स्व. संघाचे स्वयंसेवक रूद्रेश यांची अज्ञातांनी निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान पाशा या चौघा धर्मांधांना अटक केली आहे. यापूर्वीही स्वयंसेवक कुट्टप्पा, प्रवीण पुजारी आणि राजू यांची हत्या झाली असून त्यांच्या मारेकर्‍यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

५. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय)’च्या म्हैसूरू येथील अबिद पाशा आणि त्याच्या टोळीने रा.स्व. संघ अन् भाजप यांच्या ८ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या क्रूर हत्या केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.

६. अशा प्रकारे हिंदु नेत्यांच्या हत्या होण्याचे प्रमाण विशेष करून केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांत लक्षणीय आहे. हे लोण बंगाल राज्यातही पोचले असून केवळ हिंदुत्वाचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. बंगाल राज्यात जुलै २०१८ मध्ये २४ परगणा जिल्ह्यात मंदिर बाजार परिसरात भाजपच्या स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या विरोधात तक्रार केली आहे; मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

७. मे २०१८ मध्ये १८ वर्षांच्या त्रिलोचन या भाजप कार्यकर्त्याचे प्रेत झाडावर टांगून ‘भाजपसाठी काम करणार्‍यांची हीच अवस्था होईल’, असे पोस्टर लावण्यात आले होते. यानंतर केवळ २ दिवसांत ३२ वर्षीय दलाल कुमार यांचेही प्रेत विजेच्या खांबाला लटकवण्यात आले होते.

८. आतापर्यंतच्या या हत्यांमध्ये गुन्हेगार कोण आहेत ? हे विविध अन्वेषण यंत्रणांना स्पष्ट असूनही संबंधित राज्यशासनाकडून या प्रकरणी विशेष कारवाई होतांना दिसत नाही. या हत्या रोखण्यासाठी त्या त्या राज्यातील पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे आक्रमणकर्त्यांचे मनोबल वाढत आहे.

९. मध्यप्रदेशमध्ये सत्तांतर झाल्यावर लगेच अशा प्रकारे हत्या होतात, यातून ‘हिंदुत्वनिष्ठ विचारसरणी बाळगणार्‍यांना लक्ष्य केले जात आहे’, हेच दिसून येते. असे असले, तरी पोलीस या हत्यांमागे वरवर तपास करून वैयक्तिक हेवेदावे असल्याचे दाखवतात आणि या हत्यांचा तपास दडपण्याचा प्रयत्न करतात. देशभरात होत असलेल्या हिंदु नेत्यांच्या अशा हत्या एका व्यापक सुनियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

तरी या हत्या करणारे धर्मांध, त्यांच्याकडून हत्या करवून घेणारे सूत्रधार, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे यांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून सखोल चौकशी करणे अत्यावश्यक बनले आहे.

 या संदर्भात आमच्या पुढील मागण्या आहेत –

१. मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांमागील सूत्रधार, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे यांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई व्हावी. या प्रकरणांची चौकशी करण्यास राज्यशासन अपयशी ठरत असल्याने या आक्रमणांच्या घटनांचे  अन्वेषण ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे द्यावे.

२. या अन्वेषणासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करून आक्रमणकर्त्यांची पाळेमुळे खणून काढावीत.

३. मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना तात्काळ राज्यात अन् राज्याबाहेर सुरक्षा पुरवण्याचे आदेश केंद्रशासनाने द्यावेत.

                                                                                                       आपला विश्‍वासू,

                                                                                                       संघटना / व्यक्तीचे नाव

                                                                                                     (संपर्क :               )

हिंदु धर्माभिमान्यांना आवाहन !

या निवेदनांच्या प्रती हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी हिंदू आपल्या शहरातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी यांना देऊ शकतात. ही निवेदने हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहेत – https://www.hindujagruti.org/hindi/hjs-activities/rashtriya-hindu-andolan या मार्गिकेवर सदर निवेदने मराठी आणि हिंदी या भाषेत उपलब्ध आहेत. सदर निवेदने शासनदरबारी दिल्यावर त्याची माहिती दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला पाठवल्यास त्यास प्रसिद्धीही दिली जाईल.


Multi Language |Offline reading | PDF